Friday, January 23, 2026
Homeक्राईमदुचाकीवरून जाणार्‍या महिलेचे मंगळसूत्र ओरबडले

दुचाकीवरून जाणार्‍या महिलेचे मंगळसूत्र ओरबडले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील पाईपलाईन रस्ता परिसरात सोनसाखळी चोरीची घटना घडली. औषधे घेऊन दुचाकीवरून घरी परतणार्‍या एका महिलेचा पाठलाग करून, स्पीड ब्रेकरवर दुचाकीचा वेग कमी होताच चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पोबारा केला. सोमवारी (3 नोव्हेंबर) दुपारी दीड वाजेच्या सुमारास किसनगिरी रस्त्यावरील मल्हार रेसिडेन्सीसमोर हा प्रकार घडला.

- Advertisement -

याप्रकरणी अर्चना अमोल पाडसे (वय 37, रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अर्चना या दिवाळी सणानिमित्त माहेरी अहिल्यानगर येथील सावेडी उपनगरात आल्या होत्या. सोमवारी दुपारी अर्चना यांची तब्येत बरी नसल्याने त्या औषधे आणण्यासाठी आपल्या वहिनीची दुचाकी घेऊन वाणीनगर कमानीजवळील मेडिकल मध्ये गेल्या होत्या. मेडिकलमधून औषधे घेतल्यानंतर त्या किसनगिरी रस्त्याने घराकडे निघाल्या.

YouTube video player

त्यावेळी मेडिकलपासूनच एक अनोळखी इसम दुचाकीवरून आपला पाठलाग करत असल्याचे त्यांना दुचाकीच्या आरशात दिसले, मात्र त्यांनी सुरूवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. सव्वा ते दीडच्या सुमारास, अर्चना या मल्हार रेसिडेन्सीसमोर आल्या असता, रस्त्यावर स्पीड ब्रेकर आल्याने त्यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला. नेमक्या याच क्षणाची वाट पाहत असलेल्या चोर्‍याने, आपल्या दुचाकीवरून भरधाव वेगात त्यांच्या जवळ येऊन, क्षणाचाही विलंब न करता अर्चना यांच्या गळ्यातील सुमारे 15 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जोरात ओढून तोडले व पळ काढला.

या अनपेक्षित घटनेमुळे अर्चना गडबडल्या, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरड करत आपल्या दुचाकीवरून चोर्‍याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, चोरटा भरधाव वेगात असल्याने तो काही क्षणातच नजरेआड झाला. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...