Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशेतात औषध फवारणी करताना ब्लोअरमध्ये अडकून महिलेचा दुर्दैवी अंत

शेतात औषध फवारणी करताना ब्लोअरमध्ये अडकून महिलेचा दुर्दैवी अंत

येवला । प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

तालुक्यातील कातरणी येथे दुर्दैवी घटनेत माधुरी दीपक सोनवणे (वय ३०) या तरुण महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे. माधुरी सोनवणे यांना दोन मुली असून मोठी मुलगी तीन वर्षाची आहे तर दुसरी मुलगी दीड वर्षाची आहे. सदर घटनेने कातरणीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

YouTube video player

याबाबत अधिक माहिती अशी की आज ( ७ डिसेंबर ) रोजी दुपारच्या सुमारास शेतातील कांदा पिकाला औषध फवारणी करत असताना औषधाच्या टाकीतील पाणी संपल्याने माधुरी टाकीत पाणी टाकण्यास गेल्या असता ट्रॅक्टरचलीत ब्लोअरमध्ये केस अडकल्याने ती ब्लोअर मशीन मध्ये ओढली जाऊन गंभीर जखमी झाली.

नातेवाईकांनी तिला तात्काळ मनमाड येथे उपचारासाठी दाखल केले मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी उप जिल्हारुग्णालय येवला येथे दाखल करण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

येवला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून रात्री उशिरा कातरणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेने कातरणी गावावर शोककळा पसरली आहे येवला तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

ताज्या बातम्या

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्यावर दोन मोठ्या जबाबदाऱ्या, थेट सरकारी...

0
मुंबई । Mumbai राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर...