Friday, April 25, 2025
Homeजळगावसर्पदंशाने महिलेचा मृत्यू

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

वाकडी, ता.जामनेर – वार्ताहर
येथे आज दि १८ रोजी सकाळी सहा वाजता महिलेचा सर्प दंशाने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सौ.संगीता हरचंद तेली वय 45 या सकाळी सहा वाजता आपल्या राहत्या घरी असलेल्या शौचालयामध्ये प्रातःविधीसाठी गेली असता या ठिकाणी दडून बसलेल्या सर्पाने तिला दोन ते तीन वेळा दंश केला.

तिने घरामध्ये सांगितले मला काहीतरी चावल्यासारखे झाले अंधार असल्यामुळे तिच्या लक्षात लवकर आले नाही तिचे पती हरिचंद तेली व शेजारी असलेले नागरिक यांनी शोध लावला असता त्या ठिकाणी विषारी सर्प आढळून आला. त्या महिलेला त्वरित उपचारासाठी जामनेर येथे नेत असतानाच रस्त्यामध्येच महिलेचा मृत्यू झाला.

- Advertisement -

सर्पाला पकडण्यासाठी मांडवा बुद्रुक येथील रहिवासी सर्पमित्र श्रीरंग जाधव यांना संपर्क साधून बोलावण्यात आले असता ते तात्काळ येऊन त्यांनी सर्पाचा शोध घेऊन त्याला पकडले असता चार ते पाच फूट लांबीचा असलेला सर्प बघण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती त्यानंतर सर्पमित्र जाधव यांनी त्याला पकडून जंगलामध्ये सोडून दिले. संगीता तेली यांच्या पश्चात पती व तीन मुलं होत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...