अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील कापड बाजार (Kapad Bazar) परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने 26 हजार 720 रुपये किमंतीचे सोन्यांचे दागिने (Gold Jewelry) लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी (Theft) गुरुवारी सायंकाळी 5:55 वाजता घडली असून, कोतवाली पोलीस स्टेशनने (Kotwali Police Station) गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. फिर्यादी शबनम इमान सय्यद (वय 33, रा. नागरदेवळे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या श्री साईनाथ बंगल्स, घासगल्ली (कापड बाजार) येथे बांगड्या खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या.
खरेदी करत असताना त्यांच्या पर्समधील डब्यात ठेवलेले सोन्यांचे दागिने (Gold Jewelry) चोरट्याने लंपास केले. या दागिन्यांमध्ये 2 ग्रॅम 940 मिली वजनाचे सोन्याचे पेंडल, 2 ग्रॅम 570 मिली वजनाचे अष्टपैलू असे 26 हजार 720 रुपये किमतीचे सोन्यांचे दागिने (Gold Jewelry) होते. फिर्यादीने पोलिसांकडे 20 जून रोजी तक्रार नोंदवली असून, कोतवाली पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला आहे.




