Friday, May 17, 2024
Homeधुळेदोंडाईचा येथील अपघातात महिला ठार

दोंडाईचा येथील अपघातात महिला ठार

दोंडाईचा । Dondaicha । श.प्र.

गंधमुक्त कार्यक्रमाला जात असतांना दोंडाईचा (Dondaicha) येथील हॉटेल प्रशांत जवळ झालेल्या अपघातात (accident) महिलेचा (Woman killed) मृत्यू झाला.

- Advertisement -

उषाबाई भावसार (वय 50) रा. राऊळनगर दोंडाईचा असे मयत महिलेचे नाव आहे.

उषाबाई यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उषाबाई यांना वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. दोंडाईचा पोलिसात मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील रहिवासी तथा पेपर वितरक भपेंद्र भावसार यांच्या त्या पत्नी होत.

- Advertisment -

ताज्या बातम्या