Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशदिल्ली ते मुंबई विमान प्रवासादरम्यान महिलेवर अत्याचार

दिल्ली ते मुंबई विमान प्रवासादरम्यान महिलेवर अत्याचार

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून विमानात विचित्र घटना घडण्याचे सत्र सुरु आहे. दिल्लीहून (Delhi) मुंबईला (Mumbai) जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये (Indigo Flight) एका महिलेचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. या प्राध्यापकावर २४ वर्षीय डॉक्टर मुलीचा विनभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीच्या तक्रारीनंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानूसार, पटना येथील रोहीत श्रीवास्तव आणि त्या महिला डॉक्टर यांची आसन व्यवस्था एकमेका शेजारी होती. बुधवारी २६ जुलै रोजी दिल्लीहून सुटलेले विमान मुंबईला सकाळी ५.३० वाजता दाखल झाले. पण विमान मुंबईत उतरण्यापूर्वीच आरोपीने मुलीचा विनभंग केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Rain Alert : पाऊस आजही झोडपणार! अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा… जाणून घ्या, कुठे कसे असेल हवामान?

तसेच, आरोपीने या चुकीच्या हेतून स्पर्श केल्याचे मुलीने म्हटले आहे. त्यानंतर आरोपी श्रीवास्तव आणि महिलेमध्ये वाद ही झाले आणि तो इतका वाढला की विमानातील क्रू स्टाफ ही पोहोचला होता. त्यांनी या दोघांमधील भांडण सोडवण्याचे प्रयत्न ही केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यानंतर विमान लँड झाल्यानंतर दोघांना शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथे आरोपी श्रीवास्तव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचे स्टेटमेंट ही लिहून घेण्यात आले.

आरोपीच्या विरोधात कलम ३५४ आणि ३५४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आरोपीला आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, सध्या आरोपीला जामीन मिळाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पंरतु अद्याप यावर इंडिगो एअरलाईन्सकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही. दरम्यान, यावर आता पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या