Sunday, May 26, 2024
Homeनगरअंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन महिलेवर नदीपात्रात बलात्कार

अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन महिलेवर नदीपात्रात बलात्कार

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

नवर्‍याची दारू सोडायची असेल तर प्रवरा नदीपात्रात फेरी करावी लागेल, असे सांगून महिलेला नदीपात्रात नेऊन तिच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन एका भोंदूने या महिलेवर नदीपात्रामध्येच बलात्कार केल्याची घटना मंगळवारी दसर्‍याच्या दिवशी साडेसात वाजेच्या सुमारास तालुक्यातील खांडगाव परिसरात घडली.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील महिलेला याच गावातील पप्पू आव्हाड याने दारू सोडायची असेल तर आपण उपाय करतो असे सांगितले. तुझ्या नवर्‍याची दारू सोडायची असेल तर प्रवरा नदीपात्रात फेरी करावी लागेल, असे सांगून आव्हाड याने सदर महिलेला त्याच्या सोबत नदीपात्रात नेऊन बलात्कार केला. त्यानंतर आरोपी पसार झाला. याबाबत सदर महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पप्पू आव्हाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या