Monday, April 21, 2025
Homeक्राईमRahuri : महिला शिक्षकेच्या गळ्यातील साडे तीन तोळ्याचे गंठण ओरबडले

Rahuri : महिला शिक्षकेच्या गळ्यातील साडे तीन तोळ्याचे गंठण ओरबडले

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरातील न्यायालय परिसरात काल दि. 20 एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एका भामट्याने दुचाकीवरून जात असलेल्या शिक्षक महिलेच्या (Woman Teacher) गळ्यातील सुमारे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून (Chain Snatching) धूम स्टाईलने चोरी (Theft) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली.

- Advertisement -

छाया अरविंद शिंदे (वय 43), या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका असून त्या शहरातील वृंदावन नगर येथे राहतात. दि. 20 एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी छाया शिंदे व त्यांचे पती अरविंद शिंदे हे दोघे शुभकिर्ती लॉन्स येथे लग्न कार्याकरीता गेले होते. कार्यक्रम आटोपल्या नंतर रात्री 9.15 वाजे दरम्यान शिंदे पती पत्नी त्यांच्या दुचाकीवर घराकडे जात होते. दरम्यान न्यायालय परिसरातील सुर्या क्लासेस जवळ पाठीमागुन मोटारसायकलवर हेल्मेट घालून आलेल्या एका भामट्याने छाया शिंदे यांच्या गळ्यातील 1 लाख 65 हजार रुपये किंमतीचे 3 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण ओरबडून (Chain Snatching) धुम स्टाईलने चोरी केली.

त्यावेळी शिंदे यांनी आरडाओरडा केला, मात्र भामटा काही क्षणात घटनास्थळावरून पसार झाला. छाया अरविंद शिंदे या शिक्षक महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात (Rahuri Police Station) अज्ञात आरोपी विरोधात गु.र.न. 449/2025 भारतीय न्याय संहीता कलम 309 (4) प्रमाणे रस्तालूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातील महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना शहरात नित्याच्या झाल्याने महिलांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप परदेशी हे करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या