Sunday, March 30, 2025
Homeक्राईमछेड काढत महिलेवर चाकूने वार

छेड काढत महिलेवर चाकूने वार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुलाला घेण्यासाठी दुचाकीवर गेलेल्या महिलेची छेड काढून तिच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात पीडित महिला जखमी झाली आहे. शुक्रवारी (दि. 24) पावणे सात वाजता बालिकाश्रम रस्त्यावर ही घटना घडली. पीडित महिलेने याप्रकरणी शनिवारी (दि. 25) दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश मगन करवरे (रा. जाधव मळा, बालिकाश्रम रस्ता, नगर) व मनोज मगन करवरे (पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

- Advertisement -

फिर्यादी शुक्रवारी पावणे सात वाजता त्यांच्या मुलाला घेण्यासाठी गेल्या असता तेथे मुकेश उभा होता. त्याने फिर्यादीला अश्लिल भाषेत बोलून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. प्रतिकार केला असता त्याने खिशातून चाकू काढून हातावर मारून दुखापत केली. त्याचवेळी मनोजने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ‘तु जर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली तर तुला जिवंत मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करून हौदात टाकून देईल’ अशी धमकी दिली. फिर्यादी दुचाकीवरून जात असताना पाठीमागून दगड फेकून मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार भास्कर गायकवाड करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...