Friday, May 2, 2025
Homeक्राईमदारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड; पतीलाही केली मारहाण

दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड; पतीलाही केली मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून डोक्यात दगड मारून जखमी केले. सुरेखा भापकर काळे (वय 45 रा. साईनगर, भोसले आखाडा, बुरूडगाव रस्ता) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रवीण भापकर काळे (रा. साईनगर, भोसले आखाडा, बुरूडगाव रस्ता), व दीपक पुष्ट्या चव्हाण (रा. देवी मंदिरा जवळ, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. शनिवारी (5 ऑक्टोबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुरेखा त्यांच्या घरी असताना प्रवीण व दीपक तेथे आले. प्रवीणने सुरेखाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता त्यास सुरेखा यांनी नकार दिला. प्रवीणला राग आल्याने त्याने दगड उचलून सुरेखाच्या डोक्यात मारून जखमी केले.

त्यावेळी सुरेखाचे पती मध्ये गेले असता दीपकने त्यांना काठीने मारहाण केली. दोघांनी शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी सुरेखा यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामाकाजात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai राज्यातील सरकारी कार्यालयांना (Government Offices) शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन तसेच नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्याच्या उद्देशाने...