Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारमहिला बचत गटांच्या मालाला मोठ्या शहरात विक्रीसाठी प्रयत्न करणार

महिला बचत गटांच्या मालाला मोठ्या शहरात विक्रीसाठी प्रयत्न करणार

बामखेडा Bamkheda ता.शहादा । वार्ताहर

मतदार संघातील महिला बचत गटांनी Women’s self-help groups एकत्रित येऊन विविध वस्तू तयार करतात पण पाहिजे त्या प्रमाणात विक्री होणे गरजेचे आहे. यासाठी मोठमोठ्या देशांमधल्या शहरांमध्ये तयार केलेला माल एक्सपोर्ट Export of goods करून त्याची विक्री व्हावी यासाठी शासन स्तरावर आपण प्रयत्न करू असे प्रतिपादन खा.डॉ . हिना गावित Dr. Hina Gavit यांनी केले.

- Advertisement -

शहादा तालुक्यातील फेसफाटा येथे महानुभाव संप्रदायाचे श्रीपंचकृष्ण मंदिराच्या सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.डॉ हिना गावित होत्या.प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ.विजयकुमार गावित, युवानेत्या कु.सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, श्रीपंचकृष्ण मंदिराचे संचालक पूजनीय महंत आचार्य डॉ.सवस्तरकर बाबा, महानुभाव प.पू.भक्तराज दादा संवस्तरकर,जि. प.सदस्या वृंदाबाई नाईक, सरपंच लहू भिल,उपसरपंच राकेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते मनीलाल पाटील, के.डी.नाईक, माजी सरपंच पद्माबाई भील,गणेश पाटील, योगेश पाटील, लड्डूभाई चौधरी, माजी सरपंच वंदना साळुंके,किशोर पाटील,रमेश पाटील, योगेश पाटील,माजी सरपंच बापू मराठे, देविल पाटील, सरपंच मनीष गरुड, मनोज चौधरी, वसंत चौधरी, शरद पाटील,हेमकांत पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी भक्तिमय वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत महानुभाव संप्रदायातील सुख शांती प्रतीक असणार्‍या पांढराशुभ्र ध्वजाचे अनावरण खा. डॉ.हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सामाजिक सभागृहाचे उद्घाटन आ. डॉ.विजयकुमार गावित, सुप्रिया गावित,जयपालसिंह रावल यांच्या हस्ते करण्यात आले.

श्रीपंचकृष्ण मंदिरात धार्मिक

विधिवत पूजा

पंचक श्रीकृष्ण;मंदिराच्या गाभार्‍यात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण श्री मुर्तीस दूध दही शुद्ध जल याच्या ने स्नान करून श्रीकृष्णाला नवीन वस्त्र परिधान करत फुलाचा पुष्पहार अर्पण करत विडा अवसर समर्पण करून सामुहिक महाआरती करून प्रार्थना केली दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली

यावेळी खा.डॉ हिना गावित पुढे म्हणाल्या की, केंद्रसरकार महिला बचत गटांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्यासाठी जिल्ह्यातील महिला बचत गटांना कनेक्ट करून तसा आराखडा तयार करू व मतदार संघातील प्रत्येक महिला कशा सक्षम होतील यासाठी मी प्रयत्नशील आहे. यावेळी डॉ.विजयकुमार गावित म्हणाले की आमच्या परिवाराचा यापुढे एकच ध्यास आहे व विडा उचललेला आहे की, शेतकर्‍यांना शेतापर्यंत पाणी पोचविणे व व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत नागरिकांना पोचवने हा आमचा मूळ उद्देश आहे आणि तो आम्ही पूर्ण करणारच अशी ग्वाही त्यांनी त्या वेळी दिली. यावेळी परिसरातील आजी-माजी सरपंच उपसरपंच विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ व माहानूभाव पंथीय सांप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ महंत श्री.संवस्तरकर बाबा यांनी केले आभार मणिलाल पाटील मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या