Friday, April 25, 2025
Homeब्लॉगWomen's Day Special: आदीशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,...

Women’s Day Special: आदीशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू

महिला दिन विशेष

सर्वांना सस्नेह नमस्कार !
जय जिजाऊ जय अहिल्या जय सावित्री
जय शिवाजी महाराज यांना सर्वांना मानाचा मुजरा.
८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्व आदरणीय महिलांना अनेक अनेक शुभेच्छा !
आपण आपल्या जीवनात प्रत्येक भुमिका अगदी छान निभावत असतो.
आई, बिहण, पत्नी, मावशी, आत्या, मैत्रीण अशा महत्वाच्या जबाबदारीच्या भुमिका निभावतो.

- Advertisement -

आदीशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू, मावळ्याची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू.

स्त्री घरातील जबाबदारी समाजाची अपेक्षा कामांचा समतोल अगदी अचुक साधते. जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, झाशीची राणी, लक्ष्मीबाई, द्रौपदीताई मुर्मू, मदर टेरेसा, इंदिरा गांधी, तारा भवाळकर, किरण बेदी, कल्पना चावला, पी.टी.उषा, सुधामुर्ती, प्रतिभाताई पाटील, लता मंगेशकर, मिशेल ओबामा या सर्व आदरणीय महिलांनी सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य चळवळीत, राजकीय नेता, कला क्षेत्र, क्रिडा, अंतराळ क्षेत्र, स्पेस scientist, गृहउद्योग, अशा एक ना अनेक क्षेत्रात महिला आज अग्रगण्य स्थान निभावून आपली आणि आपल्या कामाचा अचूक असा समतोल साधते.

क्लाराजेटकिन यांनी आपला हा महिला दिन ८ मार्च रोजी चालू केला आणि हा सर्व Internationl women’s day म्हणून आपण सर्व भगिनी साजरा करतो.
सर्वजण म्हणतात की, प्रत्येक पुरुषा मागे एक स्री उभी असते. पण आज मी सांगते की, प्रत्येक स्रीच्या मागे एक पुरुष उभा असतो. कारण आज आपण त्यांच्यामुळेच इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्यांच्या अनमोल सहकार्यामुळे आपण आज प्रत्येक क्षेत्राच कोणतेही असो ते आपण सर्व भगिनी –महिला वर्ग काम करीत आहोत आणि कायम करणार आहोत.

जे तुम्ही आज achieve केले आहे, ते आपल्या ह्या जीवनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजाराम मोहन रॉय, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षि केशव कर्वे असे एक एक थोर पुरुषांनी महान
नेत्यांनी आपल्या महिलांना सक्षम केले आहे.

आणि आता आपले पती आपणास साथ देतात, ही खरी स्त्री-पुरुष समानता आहे.
स्त्री-पुरुष सहचर्य असले पाहीजे. यांचे नाते लिंबू-मिरची, लोणचे या सारखे असावे.
स्त्री ही घड्याळातले चाक आहे. त्यात एक तास काटा म्हणजे तिचा नवरा, बाकी काटे ही
तिचे मुले-नातवं आहे. ह्या सगळ्यांना ती अचुकपणे control करत आहे. जर आपले काही
बिघडले तर ते काटे फिरणार ही नाही आणि पळणार ही नाही त्यामुळे ते खूप मागे राहतील, त्या सगळ्यांची
विल्हेवाट लागेल. म्हणून जीवनाच्या घड्याळाचा समतोल गरजेचा आहे. यात स्त्रीला पुढे
जावेच लागेल. Control आपल्या हातात आहे. स्त्री शिवाय घराला किंमत नाही.

म्हणून सर्व महिलांना मानाचा मुजरा

कोणतीही स्त्री प्रत्येक क्षेत्रात आजरोजी आघाडीवर असून घरकाम करणाऱ्याही स्त्रीने स्वतःला कमी लेखू नये कारण ती समाजातील महत्वाची घटक असून ती एक रणांगणा आहे.

स्त्री आज असुरक्षित आहे, लैंगिक शोषण, अत्याचार या गोष्टींमुळे स्रीयांचे, मुलींचे, जीवन धोक्यात आहे. हा प्रश्न अत्याचार करणाऱ्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की ती महिला कुणाची आई, बहिण, मुलगी आहे. अशा नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, यांची मानिसकता बदलायला पाहिजे. म्हणून सर्व महिलांनी आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांना कराटेचे शिक्षण द्यायला पाहिजे.

स्त्री ही फक्त कुटुंबाचा आधार नाही, तर संपूर्ण समाजाचा आधारस्तंभ आहे. नेतृत्व
करणारी सक्षम व्यक्ती आहे. आजच्या युगात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले अस्तित्व सिध्द केले
आहे
“स्त्रीशक्ती हीच समाजाची खरी शक्ती आहे!”

सौ.मनिषा अतुल जाधव
जय डेव्हलपर्स, अकाउंटंट

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...