Friday, May 17, 2024
Homeक्रीडापुढील वर्षी महिला आयपीएलचा थरार; कशी असणार स्पर्धा? जाणून घ्या

पुढील वर्षी महिला आयपीएलचा थरार; कशी असणार स्पर्धा? जाणून घ्या

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय असलेल्या महिला आयपीएल (Women’s IPL) स्पर्धेचा पहिला हंगाम मार्च महिन्यात सुरु होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने २० षटकांचे खेळवण्यात येणार आहेत…

- Advertisement -

पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी महिला आयपीएल स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण ५ संघांचा सहभाग असणार आहे. एकूण २० सामन्यांचा थरार या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. साखळी फेरीत आयपीएल अंकतालिकेत अव्वल स्थान गाठलेला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.

कातरवाडी खून प्रकरण : पत्नीसह दोघांना बेड्या

दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जारी केलेल्या पत्रकानुसार स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये ५ विदेशी खेळाडू निवडण्याची परवानगी असेल.

उद्यापासून राज्यात पावसाची ‘सुट्टी’ मात्र…

स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये समतोल राखण्यासाठी तसेच तुल्यबळ संघ निर्माण करण्यासाठी महिला आयपीएलमध्ये सध्या ५ संघाचा समावेश करण्याचा निर्णय झाला आहे.

प्रत्येक संघांमध्ये १८ खेळाडूंचा समावेश असणार आहे. यामध्ये ६ विदेशी खेळाडू असतील यामध्ये ४ खेळाडू आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या देशांमधील तर अन्य एक खेळाडू आयसीसीच्या (ICC) सहायक सदस्य देशातील असेल. असं बीसीसीआयने (BCCI) जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

सुरगाणा : नाशिकचे ‘काश्मीर’, पाहा फोटो…

महिलांच्या आयपीएलमध्ये सामन्यांचे आयोजन होम आणि अवे फॉरमॅटमध्ये करता येणार नाही. फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिकेत टी २० वर्ल्डकप स्पर्धेनंतर लगेच मार्च महिन्यात महिला आयपीएलाचे उद्घाटन पर्व आयोजित केले जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या