अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नऊ लाख रूपये रोकड असलेली बॅग (Bag) दुचाकीवरील (Bike) अज्ञात चोराने बळजबरीने पळवून नेल्याच्या गुन्ह्यात फिर्याद देणारा कामगारच चोरी (Theft) करणारा निघाला आहे. कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) सीसीटीव्ही व तांत्रिक बाबींचा तपास करून या गुन्ह्याचा छडा लावला. नऊ लाखाची रोकड हस्तगत केली आहे. शरद रावसाहेब पवार (वय 40 रा. द्वारकालॉनशेजारी, नेप्तीफाटा, ता. नगर) असे चोरीचा (Theft) बनाव करणार्याचे नाव आहे.
धक्कादायक ! पतीने केली पत्नी व सासुची हत्या
हरिभाऊ बंडुजी शिंदे (रा. पुणे) यांनी कांदा (Onion) चाळीवर काम करणार्या मजुरांना पैसे देण्यासाठी त्यांच्याकडील कामगार पवार याला नऊ लाख रूपयांची रोकड दिली होती. पवार हा पुणे (Pune) येथून आल्यावर आयुर्वेदिक कॉलेज रस्त्यावरून जात असताना सोमवारी (दि. 14) दुचाकीवरून आलेल्या चोराने त्याच्याकडील पैशाची बॅग पळविल्याची फिर्याद त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिली होती. यावरून गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला.
नगरच्या किल्ल्यात देशविरोधी घोषणा देणार्यांवर गुन्हा दाखल
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पिंगळे यांच्यासह गुन्हे शोध पथकाला घेऊन घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाला भेट देऊन आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीची (CCTV) पाहणी केली तसेच नागरिकांना विचारपूस केली असता अशी कोणतीही घटना त्या परिसरात घडली नसल्याचे तपासात समोर आले. तपासादरम्यान फिर्यादी वरच शंका आल्याने पवार याची कसून चौकशी केली असता त्याने स्वतःच मालकाची रोकड चोरल्याची (Money Theft) कबुली दिली. पैशांची आवश्यकता असल्याने नऊ लाख रूपये नातेवाईकांकडे लपवुन ठेवल्याचे सांगितले.
निरीक्षक कटके, उपनिरीक्षक हुलगे यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक
निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक पिंगळे, उपनिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, रियाज इनामदार, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, अतुल काजळे, याकुब सय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
मनपा प्रशासनाला मोकाट कुत्र्यांच्या देखाव्याची भेट!