Saturday, April 26, 2025
Homeनगरबँकेत भरण्यासाठी दिलेली 5.70 लाखांची रोकड घेऊन कामगार गायब

बँकेत भरण्यासाठी दिलेली 5.70 लाखांची रोकड घेऊन कामगार गायब

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

व्यावसायातून जमा झालेली पाच लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी कामगाराकडे दिली असता, त्याने ती रक्कम बँकेत न भरता ती घेऊन कामगार पसार झाला. 30 ऑक्टोबर रोजी सावेडी उपनगरात हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कापड व्यावसायिक जानिमल भोजराज नवलानी (वय 71 रा. श्रीनाथ कॉलनी, सासाणेनगर, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याकडे काम करणारा राकेश कुंडलीक जावळे (रा. तारकपूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे बंगाल चौकी येथे कापड दुकान आहे. सुमारे तीन वर्षांपासून राकेश जावळे हा फिर्यादीकडे कामाला होता. तो फिर्यादी यांच्या दुकानातील कामासह घरचेही काम करत होता. तसेच फिर्यादी यांच्या बँकेच्या व्यवहाराबाबतही त्याला माहिती होते. दुकानातील जमा झालेली रक्कम तो सांगेल तेव्हा मर्चंट बँक डाळ मंडई येथे जमा करत होता. त्यामुळे फिर्यादी यांचा त्याच्यावर विश्वास होता.

कपड्याच्या दुकानातून दीपावली सणानिमित्त विक्री झालेल्या मालाचे पाच लाख 70 हजार रुपये 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी फिर्यादी यांनी जावळे याच्याकडे बँकेत भरणा करण्यासाठी दिले होते व त्याला ते 29 ऑक्टोबरला सकाळी बँक सुरू झाल्यानंतर बँकेत भरण्याबाबत सांगितले. 30 ऑक्टोबर रोजी फिर्यादी यांचा मुलगा जयकिशन याने राकेश याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा संपर्क झाला नाही.

तसेच त्याच्या पत्नीच्या मोबाईलवरही संपर्क झाला नाही. दरम्यान त्यांच्या घराला कुलूप असून त्याने दिलेले पैसे बँकेतही जमा केलेले नसल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले आहे. यानंतर फिर्यादी यांनी बुधवार, 3 नोव्हेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जावळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...