Friday, May 3, 2024
Homeनगरकर्मचार्‍यांच्या वार्षिक वेतन वाढीचा मार्ग मोकळा

कर्मचार्‍यांच्या वार्षिक वेतन वाढीचा मार्ग मोकळा

संगमनेर (वार्ताहर)- राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी 1 जुलै देण्यात येणार्‍या वार्षिक वेतन वाढीसाठी पूर्वीच्या नियमात सवलत देऊन 1जुलैला अनुपस्थित असलेल्या व सहा महिने सेवा कालावधी पूर्ण केलेल्या कर्मचार्‍यांना वार्षिक वेतन वाढ देण्यासंदर्भात शासनाने आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो कर्मचार्‍यांच्या वार्षिक वेतनवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्याच्या शासकीय व निमशासकीय सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांना 1 जुलै रोजी वेतन वाढ देण्यात येते. 1 जुलैला कार्यालयात उपस्थित राहणे संदर्भात अनिवार्यता आहे. तथापि राज्यात करोनामुळे अनेक कर्मचारी कार्यालयात उपस्थित नाहीत. त्यासाठी घरी बसून कार्यालयीन कामकाज करत असल्याचे चित्र आहे. शासनाने देखील या विशिष्ट काळात घरी बसून काम करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

त्यामुळे जे कर्मचारी 30 जूनपर्यंत सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण करत आहेत. अशा सर्व कर्मचार्‍यांना वेतनवाढ देण्यात येणार आहे. या कालावधीत जे कर्मचारी अर्जित अर्धवेतनी अथवा तत्सम रजेवरती आहेत. त्यासाठी त्यांनी कार्यालयाची परवानगी घेतली आहे. अशा कर्मचार्‍यांची सहा महिने पूर्ण होत असल्यास त्यांनाही वेतनवाढ देण्याचे सूचित केले आहे. तथापि जे कर्मचारी असाधारण अरे वरती आहेत.

मात्र 1 जुलै 2019 ते 30 जून 2020 ज्यांचा कालावधी सहा महिने पूर्ण होत आहे. त्यांनादेखील वेतन वाढ दिली जाणार आहे. सध्याच्या कालावधीत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक कर्मचारी कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे वेतनवाढीचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तात्काळ आदेश काढल्याने 1 जुलै रोजी देण्यात येणार्‍या वेतन वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या