Sunday, May 19, 2024
Homeजळगावशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे इंजिनिअरिंग शाखा निवडी संदर्भात कार्यशाळा

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे इंजिनिअरिंग शाखा निवडी संदर्भात कार्यशाळा

जळगाव – jalgaon

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे इंजिनिअरिंग शाखा निवड, इंजिनिअरिंग शाखा प्राधान्य क्रम व ऑनलाइन प्रक्रियेत असलेले पर्याय यावर दि.११ ऑक्टोबर व १२ ऑक्टोबर २०२२ रोजी समुपदेशनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

सीईटी सेल मार्फत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली असून तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांना गुणवत्ता यादीवर काही आक्षेप तथा हरकत असल्यास दि.१० ऑक्टोबर २०२२ पर्यंत हरकत सीईटी सेलला ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यासाठी कळविण्यात आले आहे. सर्व हरकती व काही त्रुटी असल्यास त्याचे निरसन करून अंतिम गुणवत्ता यादी दि.१२ ऑक्टोबर २०२२ रोजी सीईटी सेल मार्फत उपलब्ध होणार आहे.

विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर भेट देऊन तसेच स्वतःच्या लॉगिन मधून माहिती घेऊन पहिल्या टप्पाकरिता संस्था व शाखा निवडायचे प्राधान्य क्रम दि. १३ ऑक्टोबर २०२२ ते १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत करणे आवश्यक आहे. त्यानंतर दि.१८ ऑक्टोबर २०२२ रोजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमाने संस्था व शाखा मिळाल्यास पहिल्या फेरीतील प्रवेश घ्यायचा असल्यास संबधित संस्थेत जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे. तसेच पहिल्या फेरीत मिळालेल्या संस्थेत प्रवेश घ्यायचा नसल्यास प्रवेश प्रक्रिया माहितीपुस्तीकानुसार कार्यवाही करून दुसऱ्या व तिसऱ्या फेरीकरिता विद्यार्थ्यांना जाता येते.

इंजिनिअरिंग शाखा निवड, इंजिनिअरिंग शाखा प्राधान्य क्रम व ऑनलाइन प्रक्रियेत असलेले पर्याय यावर कार्यशाळा – दि.११ ऑक्टोबर २०२२ दु. ३:०० वाजता जळगाव शहराकरिता विद्यार्थी व पालकांसाठी स्थळ: सेमिनार हॉल, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था)

प्रवेश घेताना विद्यार्थी व पालकांना तसेच फॉर्म भरताना कोणत्याही संस्थेविषयी तसेच शाखाविषयी मनात शंका असते. त्यामुळे अभियांत्रिकी साठी प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थी हे एक किंवा दोन शाखेकडे तथापी संगणक व आय.टी.क्षेत्राकडे जास्त प्रमाणात आकर्षित होताना दिसतात. इतर शाखेची अपुरी माहिती व भविष्यातील संधी याबद्दल विद्यार्थी व पालकांमध्ये द्विधा अवस्था असल्याचे दिसून येत आहे.

मुळात वेगवेगळ्या क्षेत्रात कुशल अभियंते व मनुष्यबळ लागत असते त्यामुळे तेजी व मंदीमुळे वेगवेगळे औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या संधी बाबत तेजी व मंदी येत असते त्यामुळे आजच्या घडीला भविष्यात कोणती इंजिनिअरिंगची शाखा उत्तम राहील हे सांगणे कठीण असले तरी साधारणपणे तज्ञ व्यक्तीकडे अंदाज असतो. विद्यार्थी व पालकाची मनातील शाखा निवडीबाबत तसेच ऑनलाइन मध्ये ऑप्शन फॉर्म भरताना येणाऱ्या शंकेचे निरासन करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे संस्थेच्या अधिष्ठाता (III) व प्राचार्य मार्फत दि. ११ ऑक्टोबर २०२२ दु. ३:०० वाजता जळगाव शहराकरिता व दि. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी जळगाव जिल्हातील तथा महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी व पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. तरी सर्व इच्छूक विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आव्हान प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या