औरंगाबाद – aurangabad
(Ellora) वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणी (Callas Caves) आता (Tourist) पर्यटकांना १०७ फूट उंचावरून पाहता येणार आहे. त्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या वतीने लेणीच्या वरच्या भागात रस्ता तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे भारतीय पुरातत्त्व विभागाचे (Department of Archeology) अधीक्षक डॉ.मिलनकुमार चावले (Dr. Milan Kumar Chawle) यांनी सांगितले.
कैलास लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे ती वरून खाली कोरत आणली आहे. जगभरात अशा फक्त तीन वास्तू आहेत. एक (Africa) आफ्रिकेतील चर्च, दुसरे तामिळनाडूचे (Tamil Nadu) महाबली मंदिर आहे. लेणीवर सध्या निझामकालीन पायवाट आहे. तिचे मोठ्या रस्त्यात रूपांतर केले जाईल. यावरून वाहन जाणार नाही, पायीच जाता येईल. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या महानिदेशक विद्यावती यांनी नुकतीच वेरूळ लेणीची पाहणी केली. या वेळी येथील प्रस्तावित कामांवर चर्चा झाली. ही कामे पुढील वर्षभरात मार्गी लागतील. लेणी पाहण्यासाठी दरवर्षी १० लाख पर्यटक येतात.
(Ajanta Caves) अजिंठा लेणीत पाणी आणि विजेचे ३ कोटी २ लाखांचे बिल थकल्याने तीन वर्षांपासून पाणीपुरवठा खंडित केला आहे. (Jayakwadi projects) जायकवाडीच्या प्रकल्पातून फर्दापूर (Fardapur) जवळून १५ किलोमीटरची लाइन टाकून पाणी आणले आहे. सध्या भारतीय पुरातत्त्व विभाग कुंडातील पाणी पर्यटकांना देत आहे. उरलेल्या पाण्यावर उद्यान, झाडे जगवली जाताहेत. या संदर्भात राज्य सरकारकडे अनेक पत्रे पाठवली. तरीही पाणीपुरवठा योजना सुरू झालेली नसल्याचे डॉ.चावले यांनी सांगितले.
पाणीपुरवठा योजना बंद झाल्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाने २०१९ मध्ये प्रत्येक महिन्याला राज्य सरकार सोबत पत्रव्यवहार केला. या संदर्भात (mumbai) मुंबईत बैठकाही झाल्या. मात्र तोडगा निघाला नाही. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी अजिंठा लोणीला भेट दिल्यानंतर हा प्रश्न समजून घेतला. हा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे (Minister of State Abdul Sattar) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असतानाही हा प्रश्न तीन वर्षांपासून सुटू शकला नाही.