Friday, May 16, 2025
HomeUncategorizedWorld Laughter Day : आज 'जागतिक हास्य दिन'... जाणून घ्या, का...

World Laughter Day : आज ‘जागतिक हास्य दिन’… जाणून घ्या, का साजरा केला जातो? काय आहे इतिहास?

हसल्याने आणि इतरांना हसवल्याने तुमच्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक राहते. म्हणूनच असे म्हटले जाते की दररोज १० मिनिटे हसल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. लोकांना हसण्याची आठवण करून देण्यासाठी आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांना हसवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

- Advertisement -

जागतिक हास्य दिनाचा इतिहास

जागतिक हास्य दिनाची सुरुवात भारतातूनच झाली. जागतिक हास्य दिनाची स्थापना १९९८ मध्ये झाली आणि पहिला उत्सव १० मे १९९८ रोजी मुंबई, भारत येथे आयोजित करण्यात आला, ज्याचे आयोजन जगभरातील हास्य योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी केले होते. हे साजरे करण्यामागचा सर्वात मोठा उद्देश समाजातील वाढता तणाव कमी करणे हा होता. दैनंदिन व्यवहारामुळे लोकांच्या आयुष्यात हसण्याची शक्यता कमी होत आहे. अशा रीतीने १९९८ मध्ये विचार आला की असे काही का करू नये, ज्याच्या बहाण्याने लोक एकमेकांशी बोलतील आणि थोडा वेळ तरी हसतील.

शिर्डीत ६ हॉटेलवर छापा, १५ पीडित मुलींची सुटका

जागतिक हास्य दिनाचा उद्देश लोकांना आनंदाला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी हास्याच्या असंख्य फायद्यांची जाणीव करून देणे हा या जागतिक हास्य दिनाचा उद्देश आहे.जागतिक हास्य दिनाचे उद्दिष्ट लोकांना जोडणारे साधन म्हणून हास्याविषयी जागरूकता पसरवणे हा आहे. हसण्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य तर सुधारतेच पण ते तुमचे शारीरिक आरोग्य सुधारण्यासही मदत करते.

१० मे १९९८ रोजी भारतातील मुंबई येथे पहिली जागतिक हास्य दिन बैठक झाली. इंटरनॅशनल लाफ्टर क्लबचे सुमारे १२,००० सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले आणि या आनंदाच्या दिवशी हसले. यानंतर “हॅपी-डेमिक” हा भारताबाहेर साजरा केला जाणारा पहिला जागतिक हास्य दिवस होता. ९ जानेवारी २००० रोजी कोपनहेगन, डेन्मार्क येथे झालेल्या आणि सुमारे १०,००० लोकांनी हजेरी लावलेल्या या कार्यक्रमाची “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंद झाली.

धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या… घटनेचा Video व्हायरल

हसण्याचे फायदे

  • मनमोकळे हसल्याने अनेक कॅलरी झटपट बर्न होतात. चेहरा, हृदय, ओटीपोट, पाठीचा कणा येथील स्नायू बळकट होण्यास मदत होते.

  • नियमित हसण्याने हृदयविकार, मधुमेह, रक्तदाबाचा त्रास असे आजार बरे होण्यास मदत होते.

  • हसण्याने मानसिक ताण कमी होतो आणि शरीराचे अनेक स्नायू बळकट होण्यास मदत होते.

  • माणूस जेव्हा जोरजोरात हसतो त्यावेळी शरीरात भरपूर ऑक्सिजन खेचून घेतला जातो. यामुळे फुफ्फुसे निरोगी राहण्यास मदत होते.

  • हसण्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. माणूस निरोगी राहण्यास मदत होते.

  • हसण्याने शरीराला आवश्यक असलेल्या अनेक हार्मोन्सचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

  • हसण्याने ओटीपोट आणि छातीचे स्नायू मोकळे होण्यास तसेच बळकट आणि लवचिक होण्यास मदत होते.

  • संधिवात, मायग्रेन अशा आजारांना दूर ठेवण्यास हसणे लाभाचे आहे.

  • हसणे हे एक औषध आहे. हसण्याने निरोगी राहण्यास मदत होते.

  • हसण्याने इतरांवर प्रभाव टाकण्यास मदत होते. माणसांसोबतचे नाते संबंध सुधारण्यास मदत होते. जगण्याचा उत्साह वाढतो. शरीरात काम करण्यास ऊर्जा संचारते.

DRDO च्या शास्त्रज्ञाला ATS कडून अटक, हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : ना. विखेंच्या अध्यक्षतेखाली साई संस्थानच्या व्यवस्थापनासाठी प्रशासकीय समिती स्थापन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनाचे नियंत्रण आणि कार्यान्वयन अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य शासनाकडून प्रशासकीय समिती स्थापन करण्यासाठी साईबाबा संस्थानला कळवण्यात आले...