Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याTribal Day 2023 : विधानभवनात साजरा झाला जागतिक आदिवासी दिन; नरहरी झिरवाळांच्या...

Tribal Day 2023 : विधानभवनात साजरा झाला जागतिक आदिवासी दिन; नरहरी झिरवाळांच्या वेशभूषेची होतेय सर्वत्र चर्चा

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

आज दि. ९ ऑगस्ट अर्थात जागतिक आदिवासी दिन. विधान भवनाचा परिसर त्यानिमित्त आदिवासी पारंपारिक नृत्य आणि वाद्यांच्या गजराने दुमदुमून गेला. आदिवासी समाजाचे नेते तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतून आलेल्या आदिवासी बांधवांसमवेत पारंपरिक नृत्य आणि गायनात सहभागी झाले.

- Advertisement -

विधान भवनाच्या प्रांगणात त्यांनी आदिवासी नृत्यांवर ठेका धरला. यावेळी विधानसभा अध्यक्ष मा. ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी विधानसभा सदस्य राजू तोडसाम यांनी सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मणिपूरमध्ये मोदी सरकारने भारत मातेची हत्या केली; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

यावेळी स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा, क्रांतिवीर राघोजी भांगरे आणि क्रांतिवीर देवाजी राऊत यांच्या प्रतिमेस वंदन केले. यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सर्व मान्यवरांचे तसेच अधिकारी वर्गाचे पारंपारिक आदिवासी पध्दतीने तसेच क्रांतिवीरांच्या मूर्ती भेट देऊन स्वागत केले.

…म्हणून शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही; नरेंद्र मोदींचं मोठं विधान

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव-१ (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव-२ (कार्यभार) डॉ. विलास आठवले यांच्यासह महाराष्ट्र विधानमंडळातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या