Thursday, December 12, 2024
Homeमुख्य बातम्याजागतिक आदिवासी दिन विशेष : आदिवासी समाज आजही शिक्षणापासून दूर

जागतिक आदिवासी दिन विशेष : आदिवासी समाज आजही शिक्षणापासून दूर

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

जागतिक आदिवासी दिन आज 30 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. आदिवासी दिनानिमित्त या समाजाच्या प्रश्नाचा आढावा घेत असताना अनेक प्रश्न समोर येत आहे. हजारो वर्षांचा इतिहास असलेला हा समाज आहे. जंगल, डोंगरदर्‍यात राहणारा, बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क नसणारा आजही बहुतांशी कायम आहे.

- Advertisement -

लोककला, वारली चित्रकला, पारंपरिक तारपा नृत्य आणि शिल्पकला या त्यांच्याच कलांमधून आदिवासी समाजाला प्रगतीची कवाडे उघडली गेली आहेत. हा समाज निसर्गातील प्रत्येक वस्तुला आपले दैवत मानतो आणि निसर्गावर भरभरून प्रेम करतो. संयुक्त राष्ट्रसंघाने 1993 मध्ये हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरवर्षी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. आदिवासी हे मूळनिवासी असून भारतात एकूण 461 जमाती आहेत. भारताच्या प्रत्येक राज्यात आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. आरक्षणामुळे हा समाज आता हळूहळू मुख्य प्रवाहात येत आहे. महाराष्ट्रात भिल्ल,गोंड, वारली, कातकरी, माडिया, कोकणा, ठाकूर या जमाती आहेत.

रानावनात राहणारा हा समाज शिक्षणापासून मात्र खूप दूर राहिला. परिणामी समाजात निरक्षरतेचे प्रमाण प्रचंड वाढले. शेती व वीटभट्टीवर मजूर म्हणून तो राबत राहिला. पिढ्यान्पिढ्या हे असेच चालत राहिले. रोजगाराच्या शोधात कुटुंबाच्या आरोग्याकडेही त्याचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे कुपोषण व अन्य आजाराचे प्रमाण वाढले.

दरवर्षी आपल्या देशात लाखो कुपोषित बालके मृत्युमुखी पडतात. आरक्षणामुळे त्यांना शिक्षण व राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळाले. काही जण मंत्रीपदेही भूषवतात. पण एकविसावे शतक उजाडले तरी या समाजातील बहुतांशी बांधव आजही चाचपडत आहे. म्हणूनच सर्वांगीण विकास होईल तेव्हाच खरा दिन साजरा झाल्याचे समाधान होईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या