Friday, May 3, 2024
Homeनाशिकसोयाबीनवर पान अळीचा प्रादुर्भाव

सोयाबीनवर पान अळीचा प्रादुर्भाव

ओझे । वार्ताहर Dindori / Oze

दिंडोरी तालुक्यात खरीप हंगाम जोरात असून त्याला वेगवेगळ्या रोगाच्या प्रादुर्भावाने ग्रहण लागल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

- Advertisement -

खरीप हंगाम तसा शेतकरी वर्गाला अत्यंत खडतर प्रवास करून घ्यावा लागत आहे. रब्बी हंगामाचे नुकसान भरून काढण्यासाठी बळीराजांने खरीप हंगामासाठी चांगली कंबर कसली होती. त्यासाठी शेतकरी वर्गाने या हंगामात नगदी भांडवल देणारे पीक लागवडीसाठी पसंती दिली.

त्यात सोयाबीन, मका, मुग, उडीद, भुईमूग, नागली, भात व इतर भाजीपाला पिके घेण्यावर मोठ्याप्रमाणावर भर दिला. परंतु याही हंगामाने बळीराजांच्या समोरील समस्या कमी न करता त्या वाढल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जाच्या डोंगराखाली आपण गाडलो जातो की काय? अशी भीती निर्माण झाली आहे.

आता शेतकरी वर्गासमोर एक नवीनच संकट आ वासून उभे राहिले आहे. ते म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या झाडाची वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्यांचा परिणाम उत्पन्न वाढीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

झाडाची वाढ जास्त व फळ धारणा कमी हे सध्या समीकरण होऊन बसले आहे. दुसरे एक संकट निर्माण झाला आहे. ते म्हणजे सोयाबीन पिकाची पाने कुरटाळणारी आळी. ही अळी सोयाबीनचे पाने खात असल्याने त्यांचा परिणाम सोयाबीन पिकावर होत आहे.

ही अळी सोयाबीनच्या पानावर आक्रमण करून पाने खात असून ती पानाची पुर्ण चाळणी करीत आहे. यासाठी शेतकरी वर्गाला अत्यंत महागडे किंमतीचे औषधांची खरेदी करून त्याची फवारणी वेळोवेळी करावी लागत आहे.

सोयाबीन पिकाची उंची जास्त वाढल्याने मजुर कामासाठी येत नाही. आले तरी जास्त मोबदला द्यावा लागत आहे, अशी बिकट अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे.

यंदा विविध संकटामुळे प्रमाणापेक्षा जास्त भांडवल खर्च होऊन ही उत्पन्न काहीच मिळत नाही. सोयाबीन पिकांवर यंदा विविध संकटाचा विळखा पडल्यामुळे सोयाबीन वरील आमची आशा मावळली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

ज्ञानेश्वर शिंदे, सोयाबीन उत्पादक, ओझे

- Advertisment -

ताज्या बातम्या