Monday, November 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमहिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणे | Pune
देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वादात सापडल्या असून इव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खडकवासाला परिसरातील एका मतदान केंद्रावर मतदान सुरु होण्यापूर्वी त्या औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल झाल्या. त्यांनी ताटात दिवा पण ठेवलेला होता. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनची पूजा केली.

- Advertisement -

मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली. त्यानंतर चाकणकर यांच्याविरोधात पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, या घटनेचे सध्या सोशल मिडीयावर फोटो व्हायरल झाले आहे. ही घटना घडल्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे. ईव्हीएम मशीनची पूजा करतानाचा रुपाली चाकणकर यांचा फोटो राज्यभर एकदम व्हायरल झाला. त्यावरुन समाज माध्यमावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या