Sunday, September 27, 2026
Homeदेश विदेशBrij bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण...

Brij bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी माजी भारतीय कुस्ती महासंघ (WFI) अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांची दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातील सहआरोपी आणि WFI चे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनाही न्यायालयाने दोषमुक्त ठरवले. पोलिसांनी या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर केला होता. कोर्टाने हा रिपोर्ट स्वीकारला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर पोक्सोची कार्यवाही संपल्याचं मानलं जात आहे. तब्बल तीन वर्षे चर्चेत राहिलेल्या या प्रकरणाचा अखेर निकाल लागला.

२०२३ मध्ये देशातील सहा महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ, अवमानकारक वर्तन आणि धमकावल्याचे आरोप केले होते. या आरोपांनंतर दिल्लीतील जंतरमंतर येथे ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक नामांकित कुस्तीपटूंनी दीर्घकाळ आंदोलन केले होते. या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

- Advertisement -

माझ्यासाठी आनंदाचा दिवस
निकालानंतर बृजभूषण यांचे पहिले निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले. ते म्हणाले, “न्यायाधीश म्हणाले, ‘बृजभूषण आणि विनोद तोमर, तुमची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.” मी यापूर्वीच सांगितले होते की, जर कोणताही आरोप सिद्ध झाला, तर मला फाशी दिली जाईल. हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. न्यायालयाची प्रत मिळाल्यानंतर मी पुढील बोलेन.

“राजकारणात राहावे की नाही?” पंकजा-धनंजय मुंडेंच्या लागोपाठ राजकारणातील निवृत्तीच्या वक्तव्यांनी चर्चांना उधाण

कुस्तीपटुंच्या आंदोलनाला अपयश
ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले होते. ज्या सहा कुस्तीपट्टुंसोबत चुकीचे घडले, त्यात मी देखील होते, असे विनेश फोगाटने आरोप केला होता. त्यावेळी पुरूष कुस्तीपट्टूंनी देखील महिला कुस्तीपट्टूंना आंदोलनात जंतर मंतरवर पाठिंबा दिला होता. अशातच आता फोगाटसह कुस्तीपट्टूंच्या आंदोलनाला अपयश आल्याचे पहायला मिळतेय.

कोर्टात खटल्याच्या सुनावणीदरम्यान, पाच तक्रारदारांपैकी दोन महिला कुस्तीपटूंनी न्यायालयात त्यांच्या पूर्वीच्या आरोपांचे समर्थन केले नाही. त्यानंतर खटल्याची सुनावणी प्रामुख्याने त्या तीन महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांच्या आधारावर पुढे चालली, ज्यांनी याच आरोपांच्या आधारे आपला अंतिम युक्तिवाद पूर्ण केला. न्यायालयासमोर 44 साक्षीदारांची यादी सादर केली, त्यापैकी 32 जणांनी साक्ष दिली होती. त्याच्या आधारे कोर्टाने निकाल जाहीर केला आहे.

मे 2023 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर, पोलिसांनी भाजपचे माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. सहा खेळाडूंनी तक्रारी दाखल केल्या होत्या. नंतर एका अल्पवयीन पैलवानाने आपली तक्रार मागे घेतली आणि आपले विधान बदलले. आरोप निश्चितीच्या सुनावणीदरम्यान, बृजभूषण सिंह यांनी सांगितले की हे प्रकरण “खोटे आणि हेतुपुरस्सर” होते.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...