Tuesday, September 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"राजकारणात राहावे की नाही?" पंकजा-धनंजय मुंडेंच्या लागोपाठ राजकारणातील निवृत्तीच्या वक्तव्यांनी चर्चांना उधाण

“राजकारणात राहावे की नाही?” पंकजा-धनंजय मुंडेंच्या लागोपाठ राजकारणातील निवृत्तीच्या वक्तव्यांनी चर्चांना उधाण

बीड | Beed
महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. बीडच्या राजकारणात मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हे समीकरण आहे. मात्र, या दोन्ही भावंडांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. काही तासांच्या अंतराने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी केलेल्या भावनिक विधानांमुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

माजलगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार धनंजय मुंडे यांनी भावनिक उद्गार काढले. सध्याच्या राजकीय वातावरणावर थेट भाष्य करताना ते म्हणाले की, आज आपण पाहतो की, जातीपातीचं राजकारण केले जात आहे. अतिशय गलिच्छ पातळी जातीपातीच्या राजकारणात गाठली आहे. यामुळे आमच्यासारख्या माणसाला कधी वाटतं की, राजकारणात राहावं की न राहावं. पण, आमच्यासमोर महापुरुषांचे विचार आहेत. महापुरुषांनी दिलेले विचार आमच्या पाठीशी आहेत, समतेचे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असून ज्या महापुरुषांनी समतेसाठी काम केलं तेच काम आम्हाला करायचे आहे. महापुरुषांचे विचार पुढे न्यायचे आहेत. उपेक्षित वंचित घटकाला न्याय देण्यासाठी कार्यरत राहायचे आहे, असे त्यांनी म्हटले.

संपादकीय : ३ ऑगस्ट २०२६ – शाळेत नको, अन् डब्यातही!

दुसरीकडे, बीड-परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना आणि परळीतील कवी संमेलनाच्या समारोपात मंत्री पंकजा मुंडे यांचीही राजकीय निवृत्तीबाबत मोठी विधाने समोर आली आहे. समुद्धी महामार्गावर जसा एक्झिट असतो तसाच वेळ आल्यास राजकारणातूनही माझी एक्झिट असेल असे मोठे विधान पंकजा मुंडे यांनी केले. तसेच आपण ज्या देशात राहतो तिथे प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. त्यामुळे सकारात्मक टीका ऐकण्याची आपली ताकद असली पाहिजे आणि त्यातून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आपली तयारीही असली पाहिजे, असे प्रतिपादन मुंडे यांनी केले.

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, जेव्हा मी राजकारणात पहिले पाऊल ठेवले होते तेव्हाच हे स्पष्ट केले होते की जर मला राजकारण माझ्या विचारांशी सुसंगत वाटले नाही, तर मी समृध्दी महामार्गावरील एक्झिटसारखा माझाही राजकारणातून बाहेर पडण्याचा पर्याय खुला असेल. जो माणूस राजकारणातून बाहेर पडायला नेहमी तयार असतो तोच खऱ्या अर्थाने बिंधास्तपणे राजकारण करु शकतो.

विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांची वक्तव्ये काही तासांच्या अंतराने समोर आल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. मुंडे कुटुंबाचा बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव असल्याने या विधानांकडे राज्यभरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

पीएनजी

सामान्यांच्या खिशाला महागाईची झळ, घरखर्चाच्या बजेटवर होणार परिणाम; दुध, पीएनजी, सीएनजीच्या...

0
मुंबई | Mumbaiसप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करणारे अनेक बदल लागू झाले आहेत. दूध, CNG, PNG, रिक्षा-टॅक्सीचे भाडे, व्यावसायिक LPG सिलिंडर...