Saturday, September 21, 2024
Homeदेश विदेशभारतीय कुस्तीपटूंचं दिल्लीतील आंदोलन अखेर मागे; ब्रिजभूषण यांच्या बाबत मोठा निर्णय

भारतीय कुस्तीपटूंचं दिल्लीतील आंदोलन अखेर मागे; ब्रिजभूषण यांच्या बाबत मोठा निर्णय

दिल्ली | Delhi

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून कुस्तीपटूंच्या आंदोलनाने क्रीडाविश्वात खळबळ माजवली होती. पण काल रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आणि कुस्तीपटूंमध्ये बैठक सुरु होती.

या बैठकीत क्रीडा मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. यासोबतच कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांसदर्भात चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि प्रशिक्षकांकडून महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण होत असल्याचा गंभीर आरोप काही कुस्तीपटूंनी केला होता. यामध्ये भारतासाठी ऑलिम्पिक, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या काही कुस्तीपटूंचाही समावेश आहे. काहींनी तर खेळाडूंना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप केला आहे.

या सर्व आरोपांमुळे कुस्तीपटूंचं आंदोलन देशात चर्चेचा विषय ठरलं होतं. तीन दिवस हे कुस्तीपटू दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन करत होते. अखेर केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीनंतर मिळालेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी मध्यरात्री आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं. तसेच समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना पदापासून दूर राहण्याचे आदेश भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं दिल्याचं सांगितलं जात आहे.

सुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? पुत्रप्राप्तीसाठी महिलेला खाऊ घातली मानवी हाडांची राख

दरम्यान भारतीय ऑलम्पिक संघाने ७ सदस्यीय समितीची घोषणा केली असून ही समिती बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपासंदर्भात चौकशी करेल. ही समिती बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची ४ आठवड्यांच्या आत चौकशी करेल.

या समितीत मैरी कॉम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि कायदा तज्ज्ञांचा समावेश असेल. तोपर्यंत बृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघापासून स्वतःला लांब ठेवतील. आणि चौकशीमध्ये सहकार्य करतील. तोपर्यंत कुस्ती महासंघांचे काम एक समिती करेल.

ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशमधील भाजपाचे एक प्रभावी नेते आहेत. सहा वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. याआधीही ब्रिजभूषण सिंह एका व्हिडीओमध्ये वादात सापडले होते. त्यात २०२१मध्ये एका शिबिरादरम्यान एका कुस्तीपटूला थोबाडीत मारल्याचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेलेअचानक ट्रॅक्टरसमोर येऊन उभा राहिला बिबट्या अन्…, पुढं जे घडलं ते थक्क करणारं

आरोपांवर बृजभूषण शरण सिंह काय म्हणाले ? –

या संपूर्ण प्रकरणावर बृजभूषण शरण सिंह यांनी आपली बाजू मांडली आहे. कुस्तीपटूंनी लावलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे सत्य सिद्ध झाल्यास मला फाशी द्या, असे बृजभूषण म्हणाले. पैलवानांच्या संपामागे एका बड्या उद्योगपतीचा हात असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या