यावल – Yawal – प्रतिनिधी :
येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी श्रीमती नौशाद मुबारक तडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अनुसूचित जमाती महिला राखीव ही जागा नगराध्यक्षांसाठी आरक्षित होती. माजी नगराध्यक्ष सौ.सुरेखा शरद कोळी यांना जात प्रमाणपत्र न जोडता आल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले होते. त्या रिक्त जागी गेल्या सहा महिन्यापासून उपनगराध्यक्ष राकेश कोलते हे प्रभारी चार्ज सांभाळत होते.
कार्यकाल हा मोठा असल्याने या जागेवरील आरक्षणावर अन्याय होऊ नये म्हणून शासनाने नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड करण्यात यावी, असा नवीन कायदा निघाल्याने नौशाद मुबारक तडवी या एकमेव अनुसूचित जमाती महिला राखीव नगरसेविका असल्याने त्यांचा एकमेव नामांकन करण्यात आलेले होते.
दि. 14 जुलै 2020 रोजी या निवडी संदर्भात फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मतदान पद्धत अवलंबिली गेली. त्यात मोबाईल वरून प्रांताधिकारी यांनी सर्व नगरसेवकांशी संपर्क साधला. त्यानुसार माघार घेण्याची 15 मिनिट वेळ देण्यात आली होती. त्यानुसार एकमेव अर्ज आणि माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे नौशाद मुबारक तडवी यांना प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी बिनविरोध घोषित केले.
त्या माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांच्या गटातील नगरसेविका असून कायद्यानुसार छोटेसे घटाला कसा न्याय मिळतो हे कायद्याने दाखवून दिले. त्यामुळे कायदा किती श्रेष्ठ आहे व प्रथम महिला अनुसूचित जमाती मधील नगराध्यक्ष होण्याचा पहिला बहुमान नौशाद मुबारक तडवी यांच्या रूपाने या समाजाला मिळालेला आहे. ऑनलाइन निवड होताच श्रीमती तडवी यांना नगरपरिषद सभागृहांमध्ये बोलावून प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व मुख्याधिकारी बबन तडवी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रसंगी माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते हे उपस्थित होते. यांची निवड झाल्यानंतर घरी येऊन त्यांच्या समर्थक सर्व नगरसेवकांनी त्यांचे अतुल पाटील, राकेश कोलते, प्रा.मुकेश येवले, अभिमन्यू उर्फ हेंद्री शेठ चौधरी, रुखमाबाई महाजन, देवयानी महाजन, पौर्णिमा फालक, रेखा युवराज चौधरी, कल्पना वाणी, शीला सोनवणे व माजी नगरसेवक शेख असलम शेख नवी यांच्यासह नागरिकांनी आणि नातेवाइकांनी घरी येवून सोशल डिस्टंसिंग पाळत त्यांचा सत्कार केला. नगराध्यक्ष होण्याचा बहुमान हा मला कायद्याने जरी मिळाला असला तरी यामागे अतुल पाटील यांचेच खरे श्रेय आहे, असे नौशाद तडवी यांनी दै. ‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.