Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकVideo : वनहद्दीत कृत्रिम पाणवठे भागवताहेत वन्यजीवांची तहान

Video : वनहद्दीत कृत्रिम पाणवठे भागवताहेत वन्यजीवांची तहान

येवला । प्रतिनिधी

तालुक्याच्या उत्तर- पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर (Water Shortage) बनलेला असताना, उत्तर- पूर्व भागातील वनविभागाच्या (Forest Department) हजारो हेक्टर वन क्षेत्रामधील वन्यजीवांची तहान मात्र कृत्रिम पाणवठ्यामुळे भागवली जात आहे.

- Advertisement -
वनहद्दीत कृत्रिम पाणवठे भागवताहेत वन्यजीवांची तहान

यंदा उन्हाळ्याच्या वाढत्या तडाख्यात (Summer Heat) तालुक्याचा उत्तर पूर्व भाग टंचाईच्या तीव्र झळा सोसतो आहे. तहान भागवण्यासाठी उत्तर- पूर्व भागातील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईग्रस्त उत्तर-पूर्व भागात वन विभागाचे राजापूर-ममदापूर संवर्धन राखीव वन क्षेत्र आहे. या राखीव वन क्षेत्रामध्ये काळवीट, लांडगे, खोकड, सायाळ, तरस, ससे, मोर आदी हजारो प्राणी- पक्ष्यांचा मुक्तसंचार आहे. वनक्षेत्रात जवळपास आठ हजारांपेक्षा अधिक हरण, काळविटांचा वावर असल्याने हे वनक्षेत्र पर्यटकांना भुरळ घालते.

येवला तालुक्याचा उत्तर- पूर्व भाग गेल्या वर्षीच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे यंदा टंचाईच्या तीव्र झळा सोसत आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात वन विभागाने वन्यजीवांना पाण्याची उपलब्धता करून दिली आहे. वनविभागाने गेल्या दोन-तीन वर्षात केलेले नियोजन, नैसर्गिक जलस्रोत टिकून राहण्यासाठी ठिकठिकाणी केलेली बांधबंधिस्ती व सिमेंट बंधारे, चर इतर कामे याचा फायदा झाला आहे. वनक्षेत्रातील राजापूर, सोमठाण जोश, पिंपळखुटे तिसरे, ममदापूर, देवदरी, रेंडाळे, रहाडी, भुलेगाव, तळवाडे, विसापूर, अनकाई आदी ठिकाणी १५ कृत्रिम पाणवठे, १० ठिकाणी सोलरवर चालणाऱ्या कुपनलिका निर्माण केलेल्या आहेत. तर वनक्षेत्रातील १२ ठिकाणी नैसर्गिक जलस्रोत आहेत. कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकले जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळे आणि रोहित...

0
मुंबई | Mumbai राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेने (Woman) आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सदर महिलेला...