Thursday, January 8, 2026
Homeनाशिकयेवल्यात भरधाव वाहनच्या धडकेत पाच वर्षीय मुलगा ठार

येवल्यात भरधाव वाहनच्या धडकेत पाच वर्षीय मुलगा ठार

येवला । प्रतिनिधी

शहरातील विठ्ठल नगरात अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेने पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

सोमवारी, (दि. 27) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घराजवळील असलेल्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी जात असताना रुद्र समाधान पागिरे (वय ५) यास भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेने रूद्र रक्ताच्या थारोळ्यात पडला तर वाहनचालक वाहनासह पळून गेला.

YouTube video player

परिसरातील नागरिकांनी जखमी रूद्र यास तात्काळ रुग्णालयात दाखल देखील केले. मात्र, प्रकृती खालवल्याने त्यास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने आज, मंगळवारी, (दि. २८) सकाळी सहा वाजेच्या सुमारास रूद्र याची प्राणज्योत मावळली. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सदर घटनेने संतप्त झालेल्या विठ्ठल नगर येथील रहिवाशांनी अज्ञात वाहनधारकाचा शोध घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लोखंडे करत आहे.

ताज्या बातम्या