नाशिक । Nashik (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक-कमवी शाळा कृती संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी येवला ते संगमनेर पायी दिंडीस येवला येथून बुधवारी (दि.३०) सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे याच्या संपर्क कार्यालय येथे त्यांचे स्वीय सहाय्यक हरीश मुंडे आणि संभाजी पाटील जळगाव यांना दराडे यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. दिंडीत येवला शहर परिसरात सोबत सहभागी होऊन सहकार्य केले.
पायी दिंडीला किशोरभाऊ दराडे तसेच नाशिक विभागीय पदवीधर आमदार सुधीर तांबे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. तसेच वेळोवेळी दिंडी बाबत विचारपूस केली जात आहे.जोपर्यंत उच्च माध्यमिकच्या मंजूर अनुदान निधी वितरणाचा आदेश निघत नाही, तो पर्येंत पायी दिंडी थांबणार नाही. कारण त्यास मंत्रिमंडळ बैठकीची कुठलीही गरज नाही.
पायी दिंडीचा आजच्या पहिल्या दिवशी चा मुक्काम कोपरगाव होता.यावेळी किशोर दराडे यांनी दिंडीतल्या शिक्षक बांधवांची जेवणाची व्यवस्था केली.कोविड-19 चे सर्व नियमांचे पालन करून दिंडी संगमनेरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
पायी दिंडीत नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील शिक्षक सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये संघटनेचे राज्य सचिव अनिल परदेशी, नाशिक विभाग प्रमुख दिनेश पाटील, नाशिक विभाग कार्याध्यक्ष कर्तारसिंग ठाकूर, नाशिक विभाग सचिव गुलाब साळुंखे, धुळे जिल्हाप्रमुख महेंद्र बच्छाव, जळगाव जिल्हा सचिव तायडे सर, चांदवड तालुका उपाध्यक्ष विजय सोनवणे, सुरेश कापूरे, राजेंद्र साळुंखे, अरुण पाटील, प्रवीण थोरात, किशोर कढरे, नितेश वळवी, यशवंत गावित, सगरकुमार अडवाल सहभागी झाले आहेत.