Friday, May 3, 2024
Homeनाशिकयेवला : खरेदी-विक्री संघ निवडणूक बिनविरोध; कुणाची लागली वर्णी?

येवला : खरेदी-विक्री संघ निवडणूक बिनविरोध; कुणाची लागली वर्णी?

येवला | प्रतिनिधी

येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक गेल्या चार वर्षांपूर्वी येथील स्थानिक नेत्यांनी एकत्रित येऊन संघावर निवडणुकीचा भार न टाकता निवडणूक बिनविरोध केली होती. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हायला लागली. यंदा…

- Advertisement -

संघाच्या अध्यक्षपदी आज अनिल सोनवणे यांची तर उपाध्यक्षपदी दगडू टर्ले यांची सहमतीने बिनविरोध निवड करण्यात आली…

त्यानंतर टप्प्याटप्प्याने या चारही नेत्यांच्या समर्थकांची अध्यक्ष-उपाध्यक्षपदी वर्णी लागत आहे. अध्यक्ष दत्ता आहेर व उपाध्यक्ष संतोष लभडे यांनी राजीनामा दिल्याने आज निवडणूक झाली. यावेळी कुणाची वर्णी लागणार अशी उत्सुकता असताना आज सकाळी बाजार समितीत आमदार दराडे, सहकार नेते अंबादास बनकर, ऍड. माणिकराव शिंदे, युवा नेते संभाजी पवड यांची सुमारे अर्धा तास चर्चा झाली.

त्यांनी सहमतीने सोनवणे व टर्ले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर बाजार समितीच्या सभागृहात संघाच्या सर्व संचालकांची बैठक होऊन ज्येष्ठ नेते शिंदे यांनी नावाची घोषणा केली.

संचालक मंडळाने मागील चार वर्षात एकोप्याने काम करून संघाला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली आहे. शेतकरी हित साधताना त्यांनी संघही प्रगतीपथावर नेला असून यापुढेही एकोप्याने संघहिताचे काम करावे अशी सूचना आमदार दराडे व शिंदे यांनी केली.

पुढील एक वर्षाच्या कालावधीतही इतरांना संधी देण्याचा आशावादही व्यक्त करण्यात आला. सहकार विभागाच्या कार्यालयात निवडीची प्रक्रिया सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण करण्यात आली.

यावेळी मर्चंट बँकेचे अध्यक्ष अरुण काळे, राधाकिसन सोनवणे, दत्ता वैद्य, सचिन कळमकर, शरद लहरे, बाबा डमाळे आदींसह संचालक भागुनाथ उशीर, दिनेश आव्हाड, नाना शेळके, राजेंद्र गायकवाड, जनार्दन खिल्लारे, शिवाजी धनगे, त्र्यंबक सोमासे, भास्कर येवले, संतोष लभडे, आशाताई वैद्य, मिराताई पवार, जगन्नाथ बोराडे, सुरेश कदम, रघुनाथ पानसरे, रामदास पवार, भागुजी महाले, रामदास पवार, व्यवस्थापक बाबा जाधव आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या