Thursday, March 13, 2025
Homeनाशिकझाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

पंचवटी | Panchavati

म्हसरुळ परिसरातील कंसारा माता चौकाजवळ मैदानात एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नसून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे…

- Advertisement -

गणेश राजू सर्जेराव (२७, रा. पार्वती निवास, म्हसोबावाडी, पुष्पकनगर, म्हसरुळ) असे मृताचे नाव आहे. गणेश याने रविवारी (दि. २२) रोजी सकाळी नऊ वाजेपूर्वी काहीतरी कारणातून बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना गणेशने झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले.

Deshdoot Special : पालकमंत्र्यांचा ‘दम’ अन् पोलिसांची ‘दमछाक’; नाशिककरांना अशीच ‘पोलिसींग’ हवी

या प्रसंगाची वार्ता समजताच म्हसरुळ पोलीस ठाण्याचे हवालदार आर. डी. जगताप व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. पुढील तपास केला जात आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

बोधीवृक्ष फांदी रोपण कार्यक्रमाआधी भुजबळांनी बहुजन समाजाची माफी मागावी; वंचितची मागणी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...