Wednesday, April 30, 2025
Homeब्रेकिंग न्यूजअंगावर झाड पडून तरुण गंभीर जखमी

अंगावर झाड पडून तरुण गंभीर जखमी

डुबेरे । वार्ताहर Dubre

- Advertisement -

सिन्नर-डुबेरे रस्त्यावर काळे वस्तीजवळ बाभळीचे झाड अंगावर पडून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज (दि.24) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

गणेश बाळासाहेब बर्वे (36) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा मोटारसायकलने सिन्नरहून डुबेरेकडे परतत होता. दुपारच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याने रस्त्यातच तो काळे वस्तीजवळ बाभळीच्या झाडाजवळ उभा राहिला. पाऊस पडत असल्याने गाडीवर बसून तो फोनवर बोलत होता. काही कळायच्या आत अचानक झाड अंगावर पडले.

या अपघातात गणेश झाडाखाली दाबला गेला. आजूबाजूच्या लोकांनी व रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍यांनी तातडीने धाव घेत प्रयत्नांची पराकाष्ठा करून झाडाखालून गणेशला बाहेर काढले. त्यानंतर तातडीने खासगी दवाखान्यात दाखल केले. या अपघातात त्याच्या छातीला इजा झाली असून मानेचे व उजव्या पायाचे हाड मोडले आहे. त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून त्याच्या मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून गणेश या अपघातातून बचावला असल्याची चर्चा आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये! पहलगामच्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेबाबत घेतला मोठा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अगदी एका आठवड्यानंतर, मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यात तिन्ही दलांचे...