Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! अल्पवयीन मुलीची तरुणाकडून चाकूने सपासप वार करत हत्या

धक्कादायक! अल्पवयीन मुलीची तरुणाकडून चाकूने सपासप वार करत हत्या

कल्याण | Kalyan

येथील तिसगाव परिसरात (Tisgaon Area) एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला (Knife Attack) करत तिची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आसपासच्या नागरिकांनी त्या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे….

- Advertisement -

Maharashtra Rain Update : राज्यात आजपासून पावसाचे पुनरागमन? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय, वाचा सविस्तर

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य कांबळे असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून तो काल संध्याकाळीपासून कल्याणमधील आदित्य दुर्गा दर्शन सोसायटीच्या आवारात येऊन रहिवाशांना संबंधित मुलगी (Girl) घरी किती वाजता येते याची माहिती घेत होता. मात्र, येथील रहिवाशांना तो कशासाठी माहिती घेतो याची जाणीव झाली नाही. यानंतर हल्लेखोर आदित्य हा मृत मुलगी राहत असलेल्या सोसायटीच्या परिसरात दबा धरुन बसला होता.

खबरदार! वाहतूक नियम भंग कराल तर…; आता शहरावर ‘इतक्या’ सीसीटीव्हींची नजर

यावेळी मृत मुलगी बुधवारी रात्री आठ वाजता आपल्या आईसोबत (Mother) खासगी शिकवणी वर्गावरुन घरी येत होती. त्यावेळी सोसायटीतील जिन्यातून घरात जात असताना आदित्यने पाठीमागून येऊन मुलीच्या आईला ढकलून मुलीवर चाकूने सात ते आठ वार केले. यावेळी तिच्या आईने मुलाला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याने आईला दाद दिली नाही. या हल्ल्यात अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू (Death) झाला.

देशदूत विशेष : सुंदर गाव पुरस्कार प्राप्त ४५ गावांमध्ये आता ‘स्मार्ट व्हिलेज’

दरम्यान, हल्ला केल्यानंतर हल्लेखोर आदित्य कांबळे हा पळून जात असताना आसपासच्या नागरिकांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या (Police) स्वाधीन केले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात (Kolsevadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी हल्लेखोर आदित्यने दोन वेळा मयत मुलीला प्रेमासाठी गळ घातली होती. मात्र, मुलीने त्यास नकार दिल्याने तो राग मनात धरून त्याने हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik News : चांदवड टोलनाक्यावर कर्मचाऱ्याकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; गुन्हा दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या