Friday, May 3, 2024
Homeधुळेविहिरीत उडी घेत तरूणीची आत्महत्या

विहिरीत उडी घेत तरूणीची आत्महत्या

धुळे Dhule । प्रतिनिधी

तालुक्यातील चौगाव(Chaugaon) येथे खंडालय येथील तरूणाने तरूणीच्या घरात घुसून धुडगुस घातला. तिच्या पित्यालाही मारहाण केली. त्यानंतर तरूणीने(young woman) घराबाहेर पडत शेतविहीत उडी घेत आत्महत्या(Suicide) केली. काल सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी एकावर तालुका पोलिसात गुन्हा (taluka police) दाखल झाला आहे.

- Advertisement -

भाग्यश्री भटू बेडसे (वय 21 रा. चौगाव शिवार ता. धुळे) असे मयत तरूणीचे नाव आहे. दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास नितीन वसंत पाटील (रा. लोणखेडी ता.धुळे) याने तरूणीच्या घरात घुसून धुडगुस घातला. भाग्यश्री हिच्याशी झटापट केली. माझे हिच्यावर प्रेम आहे, मी हिला घेवून जाईल, असे सांगत त्याने भटू बेडसे यांना मारहाण केली. त्यानंतर दुपारी तीन वाजता भाग्यश्री ही घरातून बेपत्ता झाली.

मात्र काल दि. 17 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ती वडीलां गाव शिवारातील शेतातील विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. वरील कारणावरून तिने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. तिला नितीन पाटील याने आत्महत्येस प्रवृत्त केले, अशी फिर्याद भटू काळु बेडसे (वय 46) यांनी तालुका पोलिसात दिली आहे. त्यानुसार नितीन पाटील यांच्याविरोधात तालुका पोलिसात भांदवि कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे. तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या