Monday, July 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: "तुमच्या पाठीशी पवारांची पुण्याई, त्यामुळे…"; संजय राऊतांचा सुनेत्रा पवारांना टोला

Sanjay Raut: “तुमच्या पाठीशी पवारांची पुण्याई, त्यामुळे…”; संजय राऊतांचा सुनेत्रा पवारांना टोला

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यावर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले. खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी राज्याच्या राजकारणात पाऊल ठेवले. आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून त्या आमदार म्हणून विधानसभेत जातील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराची माघार घेतली असली तरी पोटनिवडणुक बिनविरोध होऊ शकली नाहीये. यासाठी शरद पवारांपासून ते मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केली. तसेच, आता सुनेत्रा पवारांसाठी सुप्रिया सुळे प्रचार करणार असल्याचेही सांगितले जात आहे.

सुनेत्रा पवार यांनी रविवारी (ता. 12 एप्रिल) बारामतीत प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु, त्याआधी त्यांनी पोस्ट केलेल्या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले आणि त्याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.

- Advertisement -

तुम्ही पवारांमुळे राजकारणात आहात हे विस पडता कामा नये
खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 13 एप्रिल) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बारामतीच्या प्रचाराच्या बॅनरवर आधी शरद पवारांचा फोटो होता, तो काही वेळातच काढण्यात आला, याबाबतची विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी याबाबत उत्तर देताना म्हटले की, शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का, तुम्ही कितीही मोठे झालात, अजित पवार, सुप्रिया सुळे, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही आज राजकारणात पवार म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळे आहात. याचा विसर पडता कामा नये. तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न केलात तरीही तुमच्या पाठीशी पवारांची पुण्याई आहे. ही निवडणूक अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून मविआ लढवत नाहीये. पण पुढली निवडणूक बिनविरोध नसेल.”

Asha Bhosale: “या खोलवर वाहणाऱ्या नदीला…”; आशा भोसलेंच्या निधनानंतर त्यांची शेवटची होतेय व्हायरल

राजकारणात पवार म्हणून उभे आहात ते शरद पवारांमुळे
“अजित पवार असोत, सुनेत्रा पवार असोत किंवा इतर कोणीही पवार असोत; तुम्ही कितीही मोठे झाले असाल तरीही राजकारणात ‘पवार’ म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळे उभे आहात, याचा विसर पडता कामा नये. तुम्ही कोण आहात किंवा आम्ही कोण आहोत, आम्ही सर्व ठाकरे या नावामुळे आहोत. कारण ठाकरे या नावाला वैभव आणि गौरव हा बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण करुन दिला. तेच नसते तर आम्ही काय, तुमच्या पूर्वजांनी तुमच्या आडनावाला जे वलय निर्माण करुन दिले आहे. तसेच बारामती म्हणजे शरद पवार. सध्याची निवडणूक हा पवार कुटुंबाचा कौटुंबिक विषय आहे. पण तरीही पवारांमुळे आपण आहोत हे इतरांनी लक्षात ठेवायला हवे,” असे संजय राऊतांनी सुनावले.

पुढची निवडणूक बिनविरोध होणार नाही
निवडणूकीत जय पराजय होतच असतो. पवार म्हणजे शरद पवार दुसरे कोणीही नाही. त्यांचीच पुण्याई बारामतीसह सर्वत्र आहे. त्यांचा प्रचार करायचा की नाही हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. हे फक्त एका निवडणुकीपुरती आहे. पुढची निवडणूक बिनविरोध होणार नाही. ही निवडणूक आम्ही अजित दादांना श्रद्धांजली म्हणून पाहत आहोत, असे राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरणातील साठा आज 4000 दलघफूच्या पुढे जाणार

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात पाण्याची आवक जोमाने होत आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील...