Thursday, April 3, 2025
Homeधुळेतापी नदीत उडी घेत युवकाची आत्महत्या

तापी नदीत उडी घेत युवकाची आत्महत्या

धुळे । dhule। प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील पुलावरून तापी नदीत उडी घेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत तालुका पोलिसात नोंद झाली आहे.

- Advertisement -

दुर्गेश दीपक धनगर (वय 20रा. क्रांती नगर, शिरपूर) असे मयत युवकाचे नाव आहे. त्याने काल दि. 27 रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास शिरपूरकडून धुळ्याकडे जाणार्‍या रस्त्याने सावळदे येथील पुलावरून तापी नदीत उडी घेतली. त्यात पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही बाब लक्षाच येताच तापी पात्रात शोध घेत सायंकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पाहुणे वासुदेव धनगर यांनी त्याला शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले. याबाबत पोलिसात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अहिल्यानगरच्या विठ्ठल-रूक्मिणी पतसंस्थेमध्ये 79 लाखांचा अपहार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल 79 लाख रुपयांच्या अपहाराचा प्रकार उघडकीस आला असून, संस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन,...