Friday, May 2, 2025
HomeनाशिकNashik Accident News : स्विफ्ट कार व मोटारसायकल अपघातात युवक ठार

Nashik Accident News : स्विफ्ट कार व मोटारसायकल अपघातात युवक ठार

शिरवाडे वाकद | वार्ताहर | Shirwade Wakad

भरवस फाटा ते शिर्डी (Bhrwas Phata to Shirdi) राज्य मार्गावरील शिरवाडे फाट्यावर मध्यरात्रीच्या सुमारास स्विफ्ट कार व मोटारसायकल अपघातात एक युवक (Youth) ठार झाल्याची घटना घडली आहे. तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुमो गाडीचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.२८) रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास आश्वी उंबरी ता.संगमनेर येथील मारुती स्विफ्ट कार (एम.एच २० सी.एस ०२०२) ही सोनेवाडी बु.ता.निफाड येथे दर्शन घेऊन भरवस फाट्याकडून कोळपेवाडीकडे जात असतांना बजाज अव्हेंजर (एम.एच १५ एफ.आर १९०६) या मोटारसायकल व स्विफ्ट कारची (Motorcycles and Swift Cars) जोरदार धडक झाली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : वाॅचमनला धमकावत टाकला दराेडा; गस्तीदरम्यान पाच जणांना अटक

त्यात मोटारसायकल स्वार दीपक सुधाकर टोपे (वय ३५) रा.पिंपळद ता.चांदवड याचा पाय तुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने उपचारासाठी नेत असतांना मृत्यू झाला.तर रोहित नामदेव लामखडे (वय २५) रा.दरसवाडी, ता.चांदवड युवक गंभीर जखमी (Injured) झाला असून त्याच्यावर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : गाेळीबार करणारा सराईत अटकेत

दरम्यान, या घटनेची माहिती पोलीस पाटील रामनाथ तनपुरे यांनी लासलगाव पोलीस ठाण्यास (Lasalgaon Police Station) कळवली. त्यानंतर सपोनि.भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक, संदीप शिंदे, औदुंबर मुरडनर अधिक तपास करत आहेत.

तर युवकाचा जीव वाचला असता

या अपघातात मोटारसायकल स्वार दिपकचा पाय तुटून रक्तस्राव होत होता.उपस्थितांनी १०८ सह परिसरातील सर्वच रुग्णवाहिकांना फोन करूनही तब्बल दीड तास एकही रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे उपचाराभावी पायातून जोरदार रक्तस्राव होऊन दीपकचा दुर्दैवी मृत्यू झाला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अवकाळी

Rain Update: दिल्लीत अवकाळी पावसाचा हाहाकार; वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याची...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वादळ, पाऊस आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. दिल्ली-यूपीमध्ये प्रत्येकी ४ आणि...