Sunday, September 8, 2024
Homeनगरतरुण शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला

तरुण शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला

श्रीरामपूर शहरालगतची घटना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरालगत असलेल्या ऐनतपूर शिवारात चारचाकी गाडीतून पोल्ट्री फार्मवर चाललेल्या एका तरुण शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये सदर तरुण बालंबाल बचावला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऋषीकेश गायकवाड असे तरुण शेतकर्‍याचे नाव आहे. ते आपल्या पोल्ट्री फार्मवर चालले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याच्या पंजाने संदीपचा टि-शर्ट फाटून हाताला ओरखडा बसला. या घटनेने संदीप यांनी न घाबरता गाडी पुढे नेली. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.

- Advertisement -

तसेच रात्री पुन्हा बिबट्याने याच भागातील अरुण नारायण शेळके यांच्या शेळीवर हल्ला चढवून शेळीचे नरडे फोडले. यामध्ये शेळी गंभीर जखमी झाली आहे. या दोन्ही घटनांबाबत वनरक्षक श्री. बडे यांना माहिती देण्यात आली. याअगोदरही ऐनतपूर शिवारात अनेक पाळीवर कुत्री तसेच इतर पाळीव पाण्यांवर बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना ताज्या आहेत. या भागात एकापेक्षा जास्त बिबट्यांचा वावर असून वन विभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी त्वरीत पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. वळदगाव-ऐनतपूर शिवारात बिबट्याचा उपद्रव अनेक दिवसांपासून सुरु आहे. आता तर तरुण शेतकर्‍यावर हल्ला झाल्याने परिसरात वन विभागाने अनेक ठिकाणी पिंजरे लावून या बिबट्याला पकडावे अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या