Monday, May 27, 2024
Homeजळगावरोझोदा येथील युवक सुकी नदीत बेपत्ता शोध सुरु

रोझोदा येथील युवक सुकी नदीत बेपत्ता शोध सुरु

रावेर। Raver । प्रतिनिधी

रोझोदा (ता.रावेर) येथील तरुण गारबर्डी धरणावर सुकी नदीला पूर पाहण्यासाठी मित्रांसोबत गेला होता.यावेळी पाण्यात पोहत असतांना तो बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.प्रशासन त्याचा आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या मदतीने शोध घेत आहे.हि घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे.

- Advertisement -

येथील 33 वर्षीय विवाहित तरुण गारबर्डी धरणाला आलेल्या पूर पाहण्यासाठी मित्रांसोबत गेला गेला होता.यावेळी मित्र जेवणासाठी गेल्यावर नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी जात असल्याचे सांगून परत न आल्याने,बेपत्ता झाला आहे.रवींद्र दगडू चौधरी उर्फ महेंद्र कोळी असे बेपत्ता झालेल्या तरुणांचे नांव आहे. तरुणाचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ चे पथक तैनात करण्यात आले आहे.तर तहसीलदार बंडू कापसे यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला आहे.दरम्यान शनिवारी दिवसभर झालेल्या संततधार पाऊसाने अतिवृष्टीचे संकट तालुक्यावर ओढवले आहे.

आता ओला दुष्काळ होण्याची परिस्थिती रावेर तालुक्याची झाली आहे.अहिरवाडी येथे पुराचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहे. अन्न धान्य पुरात भिजल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.नागरिकांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी संदीप सावळे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या