Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रCrime News : प्रियकराकडून भररस्त्यात प्रेयसीची हत्या

Crime News : प्रियकराकडून भररस्त्यात प्रेयसीची हत्या

गृहमंत्री फडणवीसांनी दिले 'हे' निर्देश

मुंबई | Mumbai

- Advertisement -

वसईत (Vasai) भररस्त्यात प्रियकराने लोखंडी पान्याने मारून प्रेमप्रकरणातून प्रेयसीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : म्हसरूळला रिक्षाचालकाची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, वसई पूर्व चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली असून आरती यादव असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.तर हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव रोहित यादव असे आहे.
आरोपीने प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी पानामारून तिची हत्या केली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : अखेर ‘त्या’ रिक्षाचालकाच्या हत्येचा उलगडा

विशेष म्हणजे हत्या करताना बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, कुणीही तिला सोडवले नाही. याउलट काहींनी घटनेचा व्हिडीओ बनवला. या व्हिडीओमध्ये कुणीच त्या तरुणीच्या मदतीला धावून गेले नाहीत, असे दिसत आहे. या आरोपीला वाळीव पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

हे देखील वाचा : रीलचा नाद जीवावर! रिव्हर्स घेताना एक चूक अन कारसह ‘ती’ गेली थेट दरीत… VIDEO व्हायरल

दरम्यान,आरोपीने प्रेयसीची हत्या का केली? याचे कारण समोर आले असून पोलिसांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.मृत तरुणी आणि तिची हत्या करणारा तिचा प्रियकर यांच्यात सातत्याने भांडण सुरु होते. तरुणीचे दुसऱ्या कुणासोबत प्रेमप्रकरण सुरु आहे, असा संशय आरोपी प्रियकराला होता. त्यावरून दोघांत भांडणे सुरु होती. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपीने मोठ्या इंडस्ट्रीयल पाना प्रेयसीची डोक्यात मारून तिची हत्या केली. या हल्ल्यात प्रेयसीचा जागीच मृत्य झाला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गृहमंत्री फडणवीस काय म्हणाले?

वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे, असं ट्विट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या