Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमCrime News : युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला; दारू देण्यास नकार दिल्याच्या राग

Crime News : युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला; दारू देण्यास नकार दिल्याच्या राग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

केडगाव बायपास येथील करशेटजी वाईन्स या दुकानात दारू देण्यास नकार दिल्याच्या रागातून दुकानातीलच कामगाराने युवकावर चाकूने खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओमकार घनश्याम गवळी (वय 21, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात संशयित आरोपी छोटुकुमार प्रमोदकुमार ठाकूर (वय 19 रा. बिहार) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याला 24 तासात अटक केली आहे.

- Advertisement -

दुकानाचे मालक राजेश रमेश सातपुते (वय 38, रा. केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे केडगाव येथे वाईन्स शॉप असून ओमकार हा त्यांच्या मामाचा मुलगा आहे. त्या वाईन्स शॉपवर छोटुकुमार कामास आहे. शनिवारी रात्री ओमकार दुकानाच्या काउंटरवर बसलेला असताना छोटुकुमारने त्यांच्याकडे पिण्यासाठी दारू मागितली. ओमकारने दारू देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास छोटुकुमार याने सातपुते यांच्या निवासस्थानाबाहेर ओमकारला गाठले.

YouTube video player

आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत त्याने आपल्या जवळील धारदार चाकूने ओमकारच्या छातीवर आणि हातावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ओमकारचा आवाज ऐकून घरातील नातेवाईक बाहेर धावून आले. जखमी ओमकारला तातडीने शहरातील खासगी रूग्णालयात हलवण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सातपुते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...