Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमयुवकाचा खून करून मृतदेह फेकला कुकडी कालव्यात

युवकाचा खून करून मृतदेह फेकला कुकडी कालव्यात

कर्जत |तालुका प्रतिनिधी| Karjat

बीड येथील युवकाचा खून करून मृतदेह कुकडी कालव्याच्या पाण्यामध्ये फेकून दिला. बीड येथील रणजीत सुनील गिरी (वय 23) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. कर्जत तालुक्यातील नांदगाव शिवारामध्ये पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. मयत युवकाच्या गळ्याभोवती जखम व फाशी दिल्यासारखा व्रण आढळला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. बीड येथे राहणारा रणजीत सुनील गिरी हा हॉटेल आणि ढाब्यावर आचारी म्हणून काम करत होता. मात्र मागील अनेक दिवसांपासून तो गायब होता. घरच्यांची संपर्क केल्यावर फोनवरून तो मी व्यवस्थित आहे असे सांगत होता. त्यामुळे तो कुठेतरी ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये काम करत असेल असे घरच्यांना वाटत होते. दरम्यान रात्री उशिरापर्यंत याबाबत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.

मयत रणजीत गिरी याच्यावर मिरजगाव पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जानेवारीपासून तो कर्जत येथील पोलीस कोठडीतच होता. तीन महिन्यांपूर्वी त्याची सुटका झाली होती. सुटका झाल्यानंतर देखील मयत रणजीत गिरी बीडला न जाता या परिसरामध्ये राहत होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...