Tuesday, March 18, 2025
Homeनगरतरूणाने रस्त्यावरच नर्सला छेडले

तरूणाने रस्त्यावरच नर्सला छेडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ओळखीचा फायदा घेत एका खासगी रुग्णालयातील नर्स सोबत गैरवर्तन करणार्‍या तरुणाविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय पंडीत पाखरे (वय 30 रा. चिपाडे मळा, सारसनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

नगर तालुक्यातील एका गावामध्ये राहणार्‍या पीडितेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी नगर-पुणे रोडवरील ओम गार्ड येथे झाला. फिर्यादीची अजय पाखरे याच्यासोबत ओळख होती. त्या बुधवारी सकाळी घरून निघून येथील एका खासगी रुग्णालयात ड्युटीसाठी येत असताना रस्त्यामध्ये अजय त्यांना भेटला व त्यांचा हात ओढून, चल मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हणून अंगाशी झटू लागला. फिर्यादीने त्याला विरोध केला असता त्याने त्यांना मारहाण केली. तुझ्या आई-वडिलांना जीवे मारून टाकीन, अशी धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अवघ्या काही तासांची प्रतीक्षा! अंतराळवीर सुनिता विल्यम्स, बुच विल्मोरचा परतीचा प्रवास...

0
मुंबई | Mumbaiनासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या सेवेत असणाऱ्या आणि भारतीय वंशाच्या असल्यामुळे देशासाठी अभिनास्पद कामगिरी करणाऱ्या सुनिता विलियम्स यांचे अवकाशातून परतीच्या प्रवासाकडे...