Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik Crime News : धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; संतप्त ग्रामस्थांचा...

Nashik Crime News : धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

अंबड गाव परिसरातील (Ambad Village Area) महालक्ष्मी नगर येथे दोघांनी एका २० वर्षीय युवकाचा (Youth) धारदार शस्त्राने (Sharp Weapon) खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. दरम्यान संशयित मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक (Arrested) केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा अंबड ग्रामस्थांनी घेतला असून याबाबत अंबड गावहून मयताच्या घरी व तेथून अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी मोर्चा रवाना झाला आहे….

- Advertisement -

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ॲड. गौरव गोवर्धने यांची निवड

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयूर केशव दातीर (२०,रा. फडोळ मळा, अंबड) हा दुपारी दोन वाजेच्या सुमारास महालक्ष्मी नगर येथील हनुमान मंदिराजवळ गेला असता त्याच्यामागे गाडीहून आलेला करण कडूसकर व त्याच्या साथीदाराने मयूरवर धारदार शस्त्राने छातीवर व पोटावर वार केले. या हल्ल्यात मयूर गंभीर जखमी (Injured) झाला व त्याचा घटनास्थळीच मृत्यू (Death) झाला.

Niphad News : करवाढ मागे घेण्यासाठी नागरिकांचे उपोषण

या घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव (Prashant Bacchav) उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत अंबड, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, सहाय्यक आयुक्त सिताराम कोल्हे, अंबड पोलीस ठाण्याचे (Ambad Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तर संशयित कडुसकर व त्याचे साथीदार फरार झाले असून पोलिसांनी (Police) त्यांना पकडण्यासाठी चार पथके रवाना केली आहेत. तसेच या घटनेत किती जणांचा सहभाग आहे याचा देखील पोलीस तपास घेत आहेत.

Sharad Pawar : “माझं वय झालं म्हणता, तुम्ही माझं…”; शरद पवारांनी वयावरून टीका करणाऱ्यांना सुनावलं

दरम्यान, करण कडूसकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या घटनेची माहिती अंबड गावात समजताच परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. तर याप्रकरणी अंबड ग्रामस्थांनी अंबड गावात बैठक घेऊन त्या ठिकाणाहून मयत मयूरच्या घरी मोर्चा नेला व त्या ठिकाणाहून सदर मोर्चा अंबड पोलीस ठाण्याकडे रवाना झाला आहे. जोपर्यंत संशयित आरोपींना (Accused) पकडले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय अंबड ग्रामस्थांनी घेतला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, पक्ष उभारण्यासाठी…

- Advertisment -

ताज्या बातम्या