Thursday, February 5, 2026
Homeक्राईमSuicide News : मानसिक छळाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

Suicide News : मानसिक छळाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मानसिक छळ करून तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून चौघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात 1 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लालसिंह छोगसिंह शेखावत (वय 44 रा. आदर्शनगर, राम मंदिराजवळ, नागापुर, एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

जितेंद्रसिंह सुरेंद्रसिंह राठोड (रा. आदर्शनगर, राम मंदिराजवळ, नागापूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. डिंपल राठोड, प्रियंका उर्फ सिंपल राठोड, डिंपल हिचे वडील ओनाडसिंह जयपालसिंह शेखावत (सर्व रा. गांधीनगर, जयपूर, राजस्थान) व गजेंद्रसिंह राठोड (रा. विस्तार जनपथ, जयपूर, राजस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

YouTube video player

संशयित आरोपींनी जितेंद्रसिंह राठोड यांचा सन 2016 ते 16 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मानसिक छळ केल्याने त्या सर्वांच्या मानसिक छळाला कंटाळून त्याने घराच्या टेरेसवरील इलेक्ट्रीक तारेला हात लावुन आत्महत्या केली. सदरची घटना आदर्शनगर, राममंदिराजवळ नागापूर येथे 15 जून रोजी रात्री 10.30 वाजल्यापासून ते 16 जून रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली आहे. जितेंद्रसिंह राठोड यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Accident News : राहुरी विद्यापीठाजवळील अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी कृषी विद्यापीठाजवळ नगर-मनमाड महामार्गावर 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान...