Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमतरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये काढलेले अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, पीडित मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिताच्या भावाने शुक्रवारी (15 नोव्हेंबर) फिर्याद दिली.

- Advertisement -

इसपाक ईदरीस शेख (रा. पाण्याच्या टाकीजवळ, दरेवाडी, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादी हे मुळचे उडीसा राज्यातील असून ते सध्या मोलमजुरीच्या कामानिमित्त नगर तालुक्यातील एका गावात राहतात. त्यांची अल्पवयीन बहिण (वय 17) हिने 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घराच्या बाथरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यावरून इसपाक ईदरीस शेख याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या अल्पवयीन बहिणीसोबत इसपाक शेख याने प्रेमाचे नाटक करून तिचे मोबाईलमध्ये अश्लिल फोटो काढले.

सदरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याच्या या त्रासाला कंटाळून पीडिताने 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास राहत्या घराच्या बाथरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला इसपाक शेख याने आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, इसपाक शेख पसार झाला असून त्याचा शोध घेतला जात असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुलगीर यांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...