Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजYugendra Pawar Engagement : युगेंद्र पवार-तनिष्काचा साखरपुडा संपन्न; कुटुंब दिसले पुन्हा एकत्र,...

Yugendra Pawar Engagement : युगेंद्र पवार-तनिष्काचा साखरपुडा संपन्न; कुटुंब दिसले पुन्हा एकत्र, पाहा Photos

मुंबई | Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) यांचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांचा साखरपुडा आज (रविवारी) मुंबईतील प्रभादेवी येथील इंडिया बुल्स बिल्डिंग येथे संपन्न झाला. या कौटुंबिक सोहळ्यासाठी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे सर्वजण सहकुटुंब उपस्थित होते.

- Advertisement -

पवार कुटुंबातील या नव्या पिढीच्या साखरपुड्यामुळे (Ceremony) कुटुंबात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. या सोहळ्यानिमित्त पुन्हा एकदा पवार कुटुंबातील सर्वजण एकत्र आल्याचे दिसून आले. यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार यांचे लग्न जुळल्याची माहिती इंस्टाग्रामवरुन दिली होती. त्यानंतर, आज (रविवार) तनिष्का यांच्या घरी हा साखरपुडा सोहळा संपन्न झाला.

YouTube video player

दरम्यान, या साखरपुड्यावेळी युगेंद्र पवार यांनी गुलाबी रंगाचा सदरा आणि जॅकेट घातले होते.तर तनिष्काने छान गुलाबी रंगांची साडी परिधान केली होती. यानंतर आता युगेंद्र आणि तनिष्का यांच्या साखरपुड्याचे फोटो (Photo) समोर आले असून, त्यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोण आहेत तनिष्का कुलकर्णी?

तनिष्का कुलकर्णी या मूळच्या मुंबईतील (Mumbai) असून, त्यांचे वडील नामवंत उद्योगपती आहेत. मुंबईतील प्रभादेवी परिसरातील ते रहिवाशी आहेत. तनिष्का यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले असून, विदेशात उच्च शिक्षण घेतले आहे. लंडनमधील कास बिझनेस स्कुलमध्ये त्यांनी फायनान्स क्षेत्रात आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

ताज्या बातम्या

धुरंधर

Dhurandhar 2: जबरदस्त ॲक्शन, रक्तरंजित थरार, “ये नया हिंदुस्थान” है म्हणत...

0
मुंबई | Mumbaiसगळ्यांना ज्याची प्रतीक्षा होती त्या धुरंधर फिल्मच्यी सीक्वेलचा टिझर अखेर आला आहे. आज मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी, रणवीर सिंहने चित्रपटाचे पहिले पोस्टर...