Thursday, February 5, 2026
HomeराजकीयYugendra Pawar : पवार कुटुंबात लगीनघाई! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या...

Yugendra Pawar : पवार कुटुंबात लगीनघाई! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले…

मुंबई । Mumbai

पवार कुटुंबात सध्या आनंदाचे वारे वाहत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता युगेंद्र पवार यांचाही साखरपुडा पार पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र यांचा तनिष्का प्रभू यांच्यासोबत साखरपुडा झाला. ही आनंदाची बातमी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत जाहीर केली.

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये युगेंद्र आणि तनिष्काला शुभेच्छा देत लिहिले, “आमच्या कुटुंबात आनंदाचा क्षण! माझा पुतण्या युगेंद्र पवार याचा तनिष्कासोबत साखरपुडा संपन्न झाला. दोघांनी आयुष्यभर सुख आणि समाधानाने एकत्र राहावे, हीच आमची इच्छा. तनिष्का, तुझे पवार कुटुंबात हार्दिक स्वागत!”

YouTube video player

तनिष्का प्रभू या मुंबईच्या रहिवासी असून त्यांनी परदेशातून फायनान्स विषयात शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या या नव्या प्रवासाला कुटुंबीयांसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. बारामतीच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात युगेंद्र सक्रिय आहेत. बारामती कुस्ती संघाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. याशिवाय ते विविध सामाजिक आणि राजकीय जबाबदाऱ्या सांभाळतात. यापूर्वी त्यांनी बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती, पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

पवार कुटुंबातील राजकीय मतभेद सर्वश्रुत असले तरी कौटुंबिक प्रसंगी सर्वजण एकत्र येतात. यंदा पवार कुटुंबात दोन विवाहसोहळ्यांचा आनंद साजरा होणार आहे. जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता युगेंद्र यांचा विवाहसोहळा देखील लवकरच होणार आहे. या दोन्ही समारंभांमुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे, ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंबातील आनंद द्विगुणित झाला आहे. युगेंद्र आणि तनिष्का यांच्या नव्या प्रवासासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा सोहळा बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे.

ताज्या बातम्या

Accident News : राहुरी विद्यापीठाजवळील अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी कृषी विद्यापीठाजवळ नगर-मनमाड महामार्गावर 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान...