Saturday, March 29, 2025
HomeनाशिकNashik News : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला युवासेनेतर्फे 'जोडे मारो'

Nashik News : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला युवासेनेतर्फे ‘जोडे मारो’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी महाड येथील चवदार तळ्यावर स्वताची राजकीय पोळी भाजण्यासाठी एक आंदोलन केले. याच आंदोलनांत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जितेंद्र आव्हाड यानी फाडून टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ नाशिकमध्ये युवासेनेच्या वतीने आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन छेडण्यात आले.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीच्या विरोधात नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक युवासेनेच्या (Nashik Yuva sena) वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहर (Nashik City) जिल्हा, मायको सर्कल येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन (Agitation) करण्यात आले.

दरम्यान, याप्रसंगी युवासेना विस्तारक योगेश बेलदार, महानगरप्रमुख दिगंबर नाडे, भा.वी.से. महानगरप्रमुख शुभम पाटील, झोपडपट्टी महासंघाचे जिल्हाप्रमुख भिवानंद काळे, महानगर प्रमुख सनी रोकडे, मिलिंद मोरे, ओमकार चव्हाण, श्रावण पवार यांच्यासह आदी उपस्थित होते.

.समाजात स्वत:चे कार्य न पाहता राष्ट्रपूरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान करुन स्वत:ला मोठे करु पाहणार्‍यांवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी.

भिवानंद काळे, जिल्हाप्रमुख झोपडपट्टी महासंघ शिवसेना
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...